वारकरी संप्रदाय झाला पोरका...!

हभप बापू महाराज देवरगावकर यांचे निधन
वारकरी संप्रदाय झाला पोरका...!

हरसूल | Harsul

देवरगाव ता. नाशिक येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार कै. बापू धोंडू पालवे उर्फ बापू बाबा देवरगावकर (वय ९४) यांचे वृद्धपकाळाने देवरगाव येथील निवासस्थानी निधन झाले.

वारकऱ्याच्या घरी जन्म पासून वारकरी झालेले कै बापू धोंडू पालवे कीर्तनकार म्हणून बापू बाबा देवरगावकर ह्या टोपण नावाने सुप्रसिद्ध झाले.

शिक्षण नसताना ग्रंथराज ज्ञानेश्वरी, भगवद् गीता, गाथासह शेकडो अभंग तोंडी पाठ असणारे कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. अध्यात्मिक सोबत सामाजिक राजकीय क्षेत्रात त्याचे अनेक अनुयायी आहे.नाशिक पेठ त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यात व्यसन मुक्ती साठी मोठ्या प्रमाणात योगदान होते.

अनेक गावांना होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह सुरू करून त्या गावातील तरुणांना व्यसनमुक्ती करण्यात त्याचा हातखंडा होता.

आधुनिक युगात सुद्दा समाजप्रबोधन कीर्तन करण्यासाठी ते अनेक गावांना पायी जात होते. किर्तन करण्याच्या मोबदल्यात त्यांनी कधी ही आर्थिक मोबदला घेत नसे तसेच अनेक वारकऱ्यांच्या भजनी मंडळ व शिष्यगणा ना वेळोवेळी मदत करत असल्याने त्यांना नाशिक जिल्ह्याचे प्रति संत तुकाराम म्हणून ओळख जात होते.

अध्यात्मक सोबत सार्वजनिक क्षेत्रातील पुरस्कार नाकारले होते. त्याच्या मागे 4 मुले सून नातवंडे व हजारो अनुयायी आहे.

त्याच्या निधनाने पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com