बँकेतर्फे शेतकर्‍यांना त्वरीत पैसे मिळावेत; उपमुख्यमंत्र्यांना आ.डॉ. आहेरांचे निवेदन

बँकेतर्फे शेतकर्‍यांना त्वरीत पैसे मिळावेत; उपमुख्यमंत्र्यांना आ.डॉ. आहेरांचे निवेदन

देवळा । प्रतिनिधी | Devla

देवळा तालुक्यातील (devla taluka) भऊर गावातील बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) शाखेत कार्यरत सेवकांतर्फे करण्यात आलेल्या आर्थिक अपहारातील (Financial embezzlement) पैसे ग्रामस्थांसह शेतकर्‍यांना (farmers) तात्काळ परत मिळावे या दृष्टीकोनातून कार्यवाही व्हावी,

अशी मागणी मुंबई (mumbai) येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना निवेदन (memorandum) देत आ.डॉ. राहुल आहेर (MLA Dr. Rahul Aher) यांनी केली आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Union Finance Minister Dr. Bhagwat Karad) यांना देखील सदर निवेदन देण्यात आले आहे.

देवळा तालुक्यात (devla taluka) असलेल्या भऊर गावात बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा कार्यरत आहे. या शाखेत भऊर (bhaur) गावासह परिसरातील विठेवाडी, सावकी, खामखेडा, वरवंडी, बगडू आदी गावातील ग्रामस्थांसह शेतकर्‍यांनी खाते उघडलेले आहे. राष्ट्रीयकृत बँक (Nationalized Bank) असल्याने शेतकर्‍यांनी विश्वासाने या बँकेत खाते उघडले होते. मात्र बँकेतील काही कर्मचार्‍यांनीच शेतकर्‍यांनी खात्यात भरणा करण्यासाठी दिलेले पैसे खोट्या पावत्या देऊन पैसे भरले असल्याचे भासवून प्रत्यक्ष पैसे भरलेच नसल्याचे उघड झाले आहे.

तसेच पीक विमा (Crop Insurance) कर्जाचे पैसे असो किंवा मुदतठेवीचे पैसे असो यात देखील मोठ्या प्रमाणात अपहार संबंधित कर्मचार्‍यांतर्फे करण्यात आला असल्याचे चौकशी दरम्यान उघड होत आहे. सुमारे 5 ते 6 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सातत्याने होत असलेल्या तक्रारीवरून प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या गुन्ह्याचा तपास करत असलेल्या देवळा पोलिसांनी (Devla Police) बँकेचा शाखा अधिकारी याच्यासह अन्य तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

शेतीच्या खरीप लागवडीचा हंगाम सुरू असल्याने व शेतीसाठी शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात पैशांची गरज आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास चौकशी सुरू आहे जबाबदार्‍या निश्चित करण्याचे काम होत राहिल. परंतू पैसे वेळेवर उपलब्ध न झाल्यास शेतकर्‍यांना खरीप हंगाम घेणे अवघड होणार आहे. त्यामुळे शेतकरी संत्रस्त झाले आहेत. पीकही शेतकर्‍यांना त्यांचा अपहार झालेला पैसा बँकेने जबाबदारी घेऊन त्यांच्या खात्यात वर्ग करावा या दृष्टीकोनातून आपल्यास्तरावर मदत व्हावी, असे साकडे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना घातले असल्याची माहिती आ.डॉ. आहेर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com