सायबर सुरक्षेबाबत सावधगिरी बाळगण्यासाठी बँकांनी जागरूकता आणावी: विश्वास ठाकूर

सायबर क्राइम
सायबर क्राइम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बँकांनी (banks) व्यवसायवृद्धी बरोबरच आर्थिक सुरक्षितता (Financial security) राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा जबाबदारीने व गंभीरपूर्वक वापर करण्याची प्रणाली विकसित करावी त्यासाठी अधिकारी, कर्मचार्यांसाठी सायबर सिक्युरिटी प्रशिक्षण (Cyber ​​Security Training) कार्यशाळेच्या माध्यमातून प्रबोधन करावे.

ह्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देण्याबरोबरच ती काळाजी गरज आहे हे ओळखून होणारे संभाव्य नुकसान टाळावे. असे प्रतिपादन नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर (Nashik District Urban Cooperative Banks Association President Vishwas Thakur) यांनी केले. नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनतर्फे आयोजित नाशिक जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांच्या संगणक विभागातील (आयटी) अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत (workshop) उद्घाटन झाले त्यावेळी ठाकुर बोलत होते.

नाशिक जिल्ह्यातील (nashik district) नागरी सहकारी बँकेतील 40 अधिकारी, कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता. सायबर सिक्युरीटी (Cyber ​​Security) क्षेत्रातील तज्ज्ञांनी यात मार्गदर्शन केले. अमोल पटवर्धन यांनी ‘इज युवर बँक सायबर सिक्युरीटी इन्सिडंट रेडी?’ (Is Your Bank Cyber ​​Security Incident Ready?) या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सायबर हल्ला (cyber attack) रोखण्यासाठी वेळीच दक्षता घेण्याबरोबरच, हल्ला कशामुळे झाला याविषयी माहिती घेऊन कायदेशीर बाबींची पूर्तता करावी. कायदेशीर बाबींची पूर्तता करावी.

अटॅक करणारा व्हायरस नेस्तनाबूत करावा यासाठी सायबर तज्ञांचा सल्ला घ्यावा. कंट्रोल रूम तयार करून त्यामाध्यमातून सातत्याने लक्ष ठेवावे त्यासाठी कर्मचार्यांना कायम सावध राहण्यास सांगावेे. ‘सायबर इन्शुरन्स’ या विषयावर बोलतांना अभिजीत खांडेकर म्हणाले , कायदेशीर बाबींची पूर्तता करून घटनाक्रम ,तसेच तांत्रिक बाबी , तपासून पाहून सविस्तर विश्लेषण करावे. सायबर बजेट,सिक्युरिटी सिस्टीम,बजेट अलोकेशन या बाबी यात महत्वाच्या असून सुरक्षा व आर्थिक बाबी यांचा समन्वय साधून इन्शुरन्स ची योग्य माहिती घ्यावी.

‘हाऊ टू कम्प्लाय विथ आरबीआय सर्क्युलर्स अ‍ॅण्ड नोटीफिकेशन्स’ या विषयांवर विकास नाईक यांनी मार्गदर्शन केले. स्वाती गोरवाडकर यांनी कार्यशाळा आयोजनविषयी उद्देश विषद केला. सूत्रसंचलन मनिषा पगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामलाल सानप यांनी केले. अविनाश शिंत्रे, मुकेश साळुंके, पुनम काशीकर, वैष्णवी वझे यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com