केंद्रीय योजनांना बँकांचे सहकार्य अपेक्षित : देवचक्के

केंद्रीय योजनांना बँकांचे सहकार्य अपेक्षित : देवचक्के
USER

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

मनपा सभागृहात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत केंद्र शासन (central government) पुरस्कृत प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (Pradhan Mantri Path Vendor Atmanirbhar Nidhi Yojana) व दीनदयाळ अंत्योदय योजना (Deendayal Antyodaya Yojana),

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत (National Civil Livelihood Campaigns) शहर प्रकल्प अधिकारी तथा महिला बालकल्याण उपायुक्त श्रिया देवचक्के (Shriya Devchakke Deputy Commissioner of Women Child Welfare) यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यांनी योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बँकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

बैठकीस शहरातील सर्व बँकांचे अधिकारी, एनयूएलएम विभागाचे अधिकारी (Officials of NULM Department) व कर्मचारी तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाचे कर्मचारी (Employees of Women Economic Development Corporation) उपस्थित होते. यावेळी एचडीएफसी बँकेबाबत (HDFC Bank) मनपा उपायुक्त देवचके यांनी उदासीनता व्यक्त करून

बँकेचे राज्य समन्वयक व बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे पीएम स्वनिधी अंतर्गत मंजूर परंतू वाटत न झालेले प्रस्ताव दोन दिवसात वाटप करणे, पीएम स्वनिधी अंतर्गत मंजुरीस आलेले एचडीएफसीचे 91 व बँक ऑफ बडोदाचे 234 प्रस्ताव त्वरित वाटप करावेत, लाभार्थ्यांच्या बँकविषयक तक्रारी मोठ्या प्रमाणात असून लाभार्थ्यांना बँकेत योग्य मार्गदर्शन करावे तसेच दि. 9 ते

11 ऑगस्टपर्यंत मेळावे आयोजित करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपायुक्त देवचके यांनी केल्या. दीनदयाळ अंत्योदय योजना (Deendayal Antyodaya Yojana) राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी योजना बचत गट करत आहे. त्यामुळे बचत गटांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात. बचत गटांचे बचत खाते उघडण्याची कामे प्रलंबित आहेत. बचत गटांचे कर्जवाटप प्रस्ताव मागील तीन महिन्यापासून प्रलंबित आहेत.

अशा सर्व बचत गटांना आठ दिवसात कर्जपुरवठा करण्यात यावा, अशी सूचना यावेळी देण्यात आली. सदर योजना अंमलबजावणीसाठी ज्या बँका दिरंगाई करतील, लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवतील त्यांचा अहवाल शासनास पाठवण्यात येईल, असेही उपायुक्त देवचक्के यांनी सांगितले. बैठकीचे सूत्रसंचालन शहर अभियान व्यवस्थापक रोहित कन्नोर यांनी केले. शेवटी प्रभारी व्यवस्थापक संदीप वाघ यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com