बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्याची थकबाकीदाराला मारहाण

बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्याची थकबाकीदाराला मारहाण

नाशिक । प्रतिनिधी । Nashik

एका खाजगी बँकेच्या वसुली अधिकाऱ्याला (recovery officer) ओळखपत्र विचारल्याचा राग आल्याने त्या अधिकाऱ्याने थकबाकीदाराला (Arrears) लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केल्याची घटना घडली आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक भास्कर अग्रहारकर (Deepak Bhaskar Agraharkar) (४०,रा. प्लॉट नंबर ४५४६, नंदादीप रो हाऊस, शिवनगर, तलाठी कॉलनी, तारवाल नगर, पंचवटी ) यांच्या घरी खाजगी बँकेचा (private bank) कर्मचारी अतुल जाधव (Atul Jadhav) याने येत 'तुमच्याकडे बँकेचे ८० हजार रुपये बाकी आहे ते तुम्ही भरून टाका' असे म्हटले असता दीपक यांनी त्यास ओळखपत्रे विचारले.

यावरून अतुल याला राग आल्याने त्याने दिपक यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्या ठिकाणी पडलेली भेट त्यांना मारून फेकल्याने दीपक यांच्या खांद्याचे हाड मोडले.

दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार ए.बी.गायकवाड (Constable AB Gaikwad) करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com