अपघात
अपघात
नाशिक

दुचाकी बोलेरोच्या अपघातात बँक अधिकारी ठार

तर लिपिक गंभीर

Gokul Pawar

Gokul Pawar

वणी । Vani

वणी - नाशिक रस्त्यावर येथील शंखेश्वर मंदीरासमोर दुचाकीला बोलेरोने दिलेल्या धडकेत अभोणा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी अनिल मोतीराम जगताप ( ४० रा. म्हसरुळ ) हे जागीच ठार झाले असुन बँकेचे लिपीक पंकज अरुण झा, (४२ रा. नाशिकरोड) हे गंभीर जखमी झाले आहेत. झालेल्या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान गुरुवार (दि. १६) रोजी सांयकाळी बँकेचे कामकाज आटोपल्यानंतर दुचाकीवरुन नाशिक येथे परततांना येथील शंखेश्वर मंदीरासमोर नाशिक बाजुकडून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो गाडीने धडक दिली. यात दुचाकीवरील अनिल जगताप हे जागीच ठार झाले. तर पंकज झा हे रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतात फेकले जावून गंभीर जखमी झाले आहेत.

जखमीस वणी येथील ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याबाबत रात्री उशिरा वणी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास स.पो.नि. सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिस करित आहे.

Deshdoot
www.deshdoot.com