बँक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरण : संशयितास सात दिवसांची पोलीस कोठडी

बँक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरण : संशयितास सात दिवसांची पोलीस कोठडी

भऊर | Bhaur

देवळा तालुक्यातील भऊर (Bhaur Tal Deola) येथील महाराष्ट्र बँकेच्या (Bank of maharashtra) शाखेत दीड कोटींचा अपहार (one crore fifty lakh fraud) प्रकरणातील संशयित भगवान आहेर (Bhagwan aher) यास कळवण न्यायालयाने (Kalwan Court) सात दिवसाची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. आता या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? अपहार झालेला पैसा नेमका गेला कुठे? अशा अनेक गोष्टी आता उघडकीस येणार आहेत....

सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा हा प्रकार समोर आल्यावर देवळा पोलिसांत (Deola Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या काही तासात देवळा पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या. संशयित रोजंदारीवरील कर्मचारी आहे. त्यास काल (दि.१४) रोजी सापळा रचून सोग्रस फाटा (ता चांदवड) (Sogras Phata Tal Chandwad) येथून अटक करण्यात आली होती. आज (दि. १५) त्याला देवळा पोलिसांनी कळवण न्यायालयात हजर केले असता, त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रथम दर्शनी सुमारे दीड कोटी रुपयांचा हा अपहार (Fraud) दिसत असला तरी, तक्रारदारांची रीघ बॅंकेसमोर कायम असल्याने अजून हा आकडा खुप मोठा असल्याचे बोलले जात आहे. तेव्हा इतक्या मोठ्या अपहारात नेमका कुणाकुणाचा सहभाग असल्याचे पोलीस तासात उघडकीस येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com