बनावट कागदपत्राद्वारे बँकेची ४४ लाखाची फसवणुक

गृह कर्जासाठी प्रकरण
बनावट कागदपत्राद्वारे बँकेची ४४ लाखाची फसवणुक

नाशिक । Nashik

बनावट कागदपत्रांच्या अधारे गृहकर्ज घेत कर्जाची परतफेड न करता बँकेची 44 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात विनोद प्रल्हाद पाटील (रा. काठेगल्ली) याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

देविदास विश्वनाथ पालवे (37, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार संशयित विनोद पाटील यांनी 29-09-2017 ते 12 एप्रिल 2021 दरम्यान गंडा घातला. विनोद यांनी श्रद्धा लण्ड डेव्हलपर यांच्याकडील फ्लॅट खरेदी करण्याच्या बहाण्याने एमजी रोड येथील विजया बँक (अताची बँक ऑफ बडोदा) मधे 37 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले.

कर्जाची रक्कम बांधकाम व्यावसायिक सुरेश पाटील यांची फर्म श्रद्धा डेव्हलपर या नावाच्या बँक खात्यात वर्ग केले. कर्ज घेतल्यानंतर विनोद पाटील यांनी कर्जाचे हप्ते भरले नाही. त्यामुळे बँकेचे व्याजासह 43 लाख 98 हजार 630 रुपयांचे फसवणूक झाली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल असून पोलीस तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com