बँकेची 44 लाखांची फसवणूक

बँकेची 44 लाखांची फसवणूक

नाशिक । Nashik

बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहकर्ज घेत कर्जाची परतफेड न करता बँकेची 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनोद प्रल्हाद पाटील (रा. काठेगल्ली) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

देवीदास विश्वनाथ पालवे (37, रा. नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार संशयित विनोद पाटील यांनी 29 सप्टेंबर 2017 ते 12 एप्रिल 2021 दरम्यान गंडा घातला.

विनोद यांनी श्रद्धा लॅण्ड डेव्हलपर यांच्याकडील फ्लॅट खरेदी करण्याच्या बहाण्याने एम.जी. रोड येथील विजया बँक (आताची बँक ऑफ बडोदा) मधून 37 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले.

कर्जाची रक्कम बांधकाम व्यावसायिक सुरेश पाटील यांची फर्म श्रद्धा डेव्हलपर या नावाच्या बँक खात्यात वर्ग केले. कर्ज घेतल्यानंतर विनोद पाटील यांनी कर्जाचे हप्ते भरले नाही.

त्यामुळे बँकेची व्याजासह 43 लाख 98 हजार 630 रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल असून पोलीस तपास करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com