दीडशे रुपयांसाठी हजार रुपयांचे बँक खाते

पोषण आहारासाठी बँक खाते सक्ती कितपत योग्य
दीडशे रुपयांसाठी हजार रुपयांचे बँक खाते
संग्रहित

नाशिक | Nashik

दीडशे रुपयांसाठी विद्यार्थ्यांना हजार रुपयांचे बँक खाते सक्तीचे (Bank Account Compulsory) केले आहे. त्यामुळे पालकांच्या चिंता वाढल्या आहेत.

बँक खाते उघडणे (Bank Account Opening) अनेक पालकांना परवडणारे नसून हा क्लिष्ट निर्णय शासनाने रद्द करावा, अशी मागणी छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या (Chhava Krantiveer Student Sena) वतीने शिक्षण उपसंचालकांना (Deputy Director of Education) दिलेल्या निवेदनाद्वारे (Statement) केली आहे.

दरम्यान केंद्राच्या शालेय पोषण आहार (School nutrition diet Scheme) योजने द्वारे विद्यार्थ्यांना अन्नधान्य पुरवले जाते. परंतु कोरोनाच्या परिस्थितीत (Corona Crisis) मुलांना शिजवलेले अन्न देणे शक्य नव्हते.

त्यामूळे राज्यातील प्राथमिक उच्च माध्यमिक जिल्हा हायस्कूल (Primary school) अनुदानित अंशतः अनुदानित सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून रक्कम जमा करण्यात येत आहे.

परंतु दिली जाणारी रक्कम यापेक्षा बँक अकाउंट खोलण्यासाठी लागणारी रक्कम अधिक आहे. त्यामुळे योजना कितीही चांगली असली तरी विद्यार्थ्यांना बँक अकाऊंट उघडताना अनेक अडचणी येत आहे. याबाबत पोषण आहार विभागाकडे (Department of Nutrition) माहिती घेतली असता विद्यार्थ्यांच्या खात्यात किती रक्कम जमा केली जाणार याबाबत स्पष्ट माहिती सध्या प्राप्त झाली नाही असे सांगण्यात येत आहे.

काही अडचणी काही प्रश्न

नव्याने खाते खोलण्यासाठी लहान मुलांना देखील बॅंक /सेवा केंद्रात (Bank Services Center) बोलावण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातच रक्कम जमा करण्याचा आग्रह का धरला जात आहे?

विद्यार्थ्यांच्याच खात्यावर पैसे जमा करण्याऐवजी पालकांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचा पर्याय का असू नये. झिरो बलेंस अकाउंट (Zero Balance Account) ओपन करण्याचे बँकांना आदेश द्यावे.

विद्यार्थ्यांना अकाउंट ओपन करायला सांगितले आहे ते फक्त शालेय पोषण आहारा पुरतेच मर्यादित आहे असे नाही शासनाच्या इतर अनेक योजना या वर्षभर सुरू असतात. त्यानिमित्त जेव्हां जेव्हां काही रक्कम जमा करण्याची वेळ येईल, ती यापुढे याच खात्यांवर जमा करण्यात येतील. त्यामुळे भविष्याचा विचार करता सध्या विद्यार्थ्यांनाच खाते उघडण्यास सांगितले जात आहे.

_नितीन उपासनी (शिक्षण उपसंचालक , नाशिक)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com