नाशकातील पाच प्रयोगशाळांवर बंदी
नाशिक

नाशकातील पाच प्रयोगशाळांवर बंदी

करोना संशयितांची माहिती देण्यात हलगर्जी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधीत रुग्णांच्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना अलगिकरण आवश्यक असतांना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचा अपुर्ण पत्ता दिला गेला. आवश्यक उपाय योजना करता आल्या नाही. परिणामी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत महापालिका प्रशासनाकडुन शहरातील रुग्णांच्या करोना चाचणी करणार्‍या पाच प्रयोगशाळांना चाचणीसाठी बंदी घातली आहे. पुढील आदेश येईपर्यत हा बंदीचा आदेश लागु राहणार आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रातील रुग्णांसाठी शासनाकडुन शहरात मान्यता देण्यात आलेल्या लॅब पैकी थायरोकेअर, दातार, एसआरएल व इन्फेक्स यांच्यासह पुण्यातील क्रश्णा या लॅबवर चाचणीस बंदी घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात करोना चाचणीचा अहवाल महापालिकेला पाठवितांना संबंधीत लॅबकडुन पॉझिटीव्ह रुग्णांचा अपुर्ण पत्ता दिला गेला होता. रुग्णांचे वय व लिंग यासमोर बाधीत रुग्णांचा पत्ता नाशिकरोड, पंचवटी, नाशिक असे मोघम पत्ते देण्याचे काम लॅबकडून झाल्यामुळे महापालिका आरोग्य वैद्यकिय विभागाला पॉझिटीव्ह रुग्णांचा पत्ता शोधण्यात काही तासांचा वेळ लागला.

परिणामी पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तींना तत्काळ वेगळे करता न आल्याने प्रादुर्भाव वाढला गेला. काही लॅब डॉक्टराच्या सल्ल्यानुसार परस्पर चाचण्या करुन घेत असल्याने बाधीत रुग्णांची माहिती मिळण्यात अडचणी आल्या. तसेच बाधीत झालेल्या रुग्णांची यादी आयसीएमआर पोर्टलवर टाकणे गरजेचे असतांना ते पाळण्यात आले नाही. अशाप्रकारे काम लॅब कडुन झाल्याने महापालिकेने या पाच लॅबला पुढील आदेश होईपर्यंत चाचणीला बंदी घातली आहे.

लॅबकडून दुरुस्ती झाल्यानंतरच चाचणी

संशयित रुग्णांची लॅबकडुन चाचणींसाठी नोंदणी झाल्यानंतर ती माहिती आयसीएमआर पोर्टलवर भरणे बंधनकारक असते. त्यामुळे महापालिकेला याची माहिती मिळाल्यानंतर संबंधीत व्यक्तींचा तपास घेऊन करोना प्रादुर्भाव रोखता येतो. मात्र संशयितांचा संपुर्ण नाव व पत्ता, मोबाईल नंबर दिला गेला नाही, म्हणुन संबंधीत लॅबला दोनदा नोटीसा दिल्या होत्या. त्यानंतर दुरुस्ती न केल्याने त्यांच्या चाचणी थांबविण्यात आल्या आहे. लॅबकडुन चाचण्यातील संपुर्ण माहिती दिल्यास त्यांच्या चाचण्या सुरु ंहोतील.

डॉ. बापुसाहेब नागरगोजे, आरोग्य वैद्यकिय अधिकारी.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com