Nagar Market
Nagar Market
नाशिक

उद्यापासून त्र्यंबकेश्वरमध्ये बंद

एकूण ५ प्रतिबंधीत क्षेत्र

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

त्र्यंबकेश्वर नगरीत करोना विळखा वाढत असल्याने १५ ते २८ जुलै या काळात दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. यात भाजीपाला, किराणा यांचाही समावेश आहे. या वेळीं १४ दिवसाचा कडक बंद पाळला जाणार आहे.असे नगरपालिका मुख्यधिकारी संजय जाधव व नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगवकर यांनी तसे जाहीर केले आहे.

आतापर्यन्त त्र्यंबकेश्वर नगरीतला हा चौथा बंद आहे. नगरीत आता करोनाचे एकूण ५ प्रतिबंधीत क्षेत्र आहेत. नाशिकमध्ये उपचार घेत असताना येथील महिला मृत पावली दि. १२ रोजी पहाटे या महिलेचे निधन झाले तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान आज सकाळी दोन पुरुष रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, याला डॉ. योगेश मोरे यांनी दुजोरा दिला.

Deshdoot
www.deshdoot.com