'या' ठिकाणी दिवसा अवजड वाहनांना बंदी; पोलीस -मनपा अधिकार्‍यांच्या बैठकीत निर्णय

'या' ठिकाणी दिवसा अवजड वाहनांना बंदी; पोलीस -मनपा अधिकार्‍यांच्या बैठकीत निर्णय

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

वर्दळीच्या कुसुंबा रोडवर दिवसा अवजड वाहनांना (Heavy vehicles) प्रवेश बदलीचा निर्णय पोलीस-मनपा प्रशासन (Police-Municipal Administration) अधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. मध्यरात्री 12 वाजेनंतर अवजड वाहने या रस्त्यावरून मार्गस्थ होऊ शकणार या निर्णयाच्या अंमलबजावणी स प्रशासनातर्फे प्रारंभ करण्यात आला आहे.

कुसुंबा रोडवर काही दिवसापूर्वी रात्री अवजड क्रेनच्या चाकाखाली येऊन चिरडला गेल्याने बालकाचा दुर्दैवी अंत झाला होता. कुसुंबा रोड नूतनीकरणाचे काम (Road renewal work) सुरू असल्याने एकच मार्ग वापरला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता या रस्त्यावरून दिवसा अवजड वाहनांना प्रवेश बंदीचा (Entry ban for heavy vehicles) अधिकार्‍यांनी घेतला. मालेगाव (malegaon) मध्याचे आ. मौलाना मुक्ती इस्माइल यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला.

अवजड क्रेनच्या चाकाखाली येऊन बालक ठार झाल्याने संतप्त झालेल्या जमावाने वाहनाची तोडफोड करीत वाहतूक बंद पाडली होती. पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. कुसुंबा रोडचे संथ गतीने होत असलेले काम तसेच अवजड वाहनांची ये- यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे. या पार्श्वभूमीवर आ.मौलाना मुफ्ती यांनी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी (Upper Superintendent of Police Chandrakant Khandvi) यांचे सह सहाय्यक आयुक्त सचिन महाले (Assistant Commissioner Sachin Mahale), शहर अभियंता कैलास बच्छाव आदी मनपा अधिकार्‍यांची बैठक घेत चर्चा केली.

कुसुंबा रोडचे काम गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ठेकेदाराने सुरू केले. नऊ महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित ते झालेले नाही. अशातच अवजड वाहने व एकेरी मार्ग सुरू असल्याने या रस्त्यावर अपघाताच्या (accidents) घटना सातत्याने घडून निरपराधांचा बळी जात असल्याचा आरोप आ.मौलाना यांनी यावेळी बोलताना केला. यावेळी ठेकेदारांनी दीड महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन आमदारासह अधिकार्‍यांना दिले. हेे काम 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास आपण जनतेसह आंदोलन छेडू इशारा आ. मौलाना मुफ्ती यांनी यावेळी दिला.

कुसुंबा रोडवर दिवसा अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस तैनात केले जाईल. टोल वाचविण्यासाठी सुरत- धुळे भागातून मार्गस्थ होणारे वाहने कुसुंबा रोडचा वापर अधिक करतात. यात अवजड वाहनांची संख्या जास्त आहे. अशातच रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक होत असते. त्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहनाना दिवसा प्रवेश बंद ठेवला जाणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com