बालभारतीच्या पुस्तक वितरणाला सुरुवात

शिवाय विद्यार्थ्यांना ऑनलाईन वाचता येणार
बालभारतीच्या पुस्तक वितरणाला सुरुवात

नाशिक | Nashik

कोरोना परिस्थिती च्या आढाव्यानंतर आता पहिली ते बारावी च्या विद्यार्थांसाठी ऑनलाईन स्वरुपात शाळांना सुरुवात झाली. याअनुशंगाने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ,बालभारती यानी विद्यार्थ्यांनासाठी पाठ्यपुस्तक विक्रिसाठी उपलब्ध केली आहेत.

बालभारतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थांना वेगवेगळ्या आठ भाषांमध्ये पाठ्यपुस्तके व चार भाषांमध्ये कार्यपुस्तिका (workbook) उपलब्ध केल्या आहे. ही पुस्तके 9 वितरक केंद्रांवरुन खुल्या बाजारातील विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी पुस्तक विक्रेते आणि शैक्षणिक संस्था यानी बालभारती येथे नोंदणी करायची आहे. शैक्षणिक संस्थाना शासन निर्णयाची प्रत आणि विश्वस्त संस्थाच्या नोंदणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत जमा करुन नोंदणी करता येणार असल्याचे बालभारती पुस्तक भांडार, नाशिक यांनी सांगितले.

बहुतेक ठिकाणी कोरोना निर्बंधात घरातुन बाहेर पडत प्रत्यक्ष पुस्तक विकत घेता येणार नाही .त्यातच ऑनलाईन पध्दतीनेच पहिली ते बारावी चे वर्ग भरणार असल्यामुळे बालभारतीच्या ebalbharti.in या संकेत स्थळावर पीडीएफ स्वरुपात पुस्तके विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना येथून ती डाऊनलोड करुन वाचता येणार आहे.

नोंदणीची प्रक्रिया -

अधिकृत पुस्तक विक्रेत्यांना नोंदणी साठी नोंदणी शुल्क एक हजार रोख रुपये आणि पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. सोबत आधार कार्ड,पॅन कार्ड, जीएसटी प्रमाणपत्र, संस्थेच्या बॅंकखातेपासबुक, शॉप ॲक्ट नोंदणी प्रमाणपत्र यांच्या छायांकित प्रती तसेच नोंदणी अर्जातील माहीती आणि नियमावली मान्य संदर्भात १०० रुपयाची नोटरी अशा कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com