बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे नाशिक जिल्ह्यासाठी विशेष समिती गठीत; 'यांना' मिळाली संधी

बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे नाशिक जिल्ह्यासाठी विशेष समिती गठीत; 'यांना' मिळाली संधी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi ShivSena) पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा समिती गठीत (Nashik District Committee) करण्यात आली आहे...

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) आगामी सार्वत्रिक निवडणूकांचे तसेच जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांचे नियोजन करण्यासोबतच संघटनात्मक बांधणी, संघटनात्मक निर्णय, विविध आंदोलनांसह (Agitations) सरकारने घेतलेले विविध निर्णय हे सर्व जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम या समितीच्या माध्यमातून होणार आहे.

दरम्यान, या समितीमध्ये पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. सुहास कांदे, नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रविण तिदमे, नाशिक लोकसभा सहसंपर्कप्रमुख राजु लवटे यांचा समावेश आहे. समिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे काम करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com