
सुरगाणा | वार्ताहर | Surgana
आदिवासी भागात (tribal areas) अद्यापही रस्ते, आरोग्य, दळणवळण, शेती करीता सिंचन, कुपोषण (Malnutrition) या समस्या जैसे थे आहेत.
एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. पण अद्याप ही या मूलभूत समस्या (Basic problem) आदिवासींपुढे आ वासून उभ्या आहेत, त्या दुर करण्यासाठी येत्या काळात पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर सारखे मागासलेल्या
तालुक्यातील विकासासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन बाळासाहेबांची शिवसेना (shivsena) पक्षाचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी सुरगाणा तालुक्यातील शिष्टमंडळाला दिले.
या शिष्टमंडळात सुरगाणा (Surgana) तालुका अध्यक्ष हरिभाऊ भोये, तुळशीदास पिठे, शास्त्री गावित, चितांमण गायकवाड, रमेश गायकवाड, पोपट पवार, भाऊसाहेब पिठे, विनायक गावित, मालगव्हाणचे संरपच योगेश ठाकरे, जयराम चौधरी, प्रकाश वळवी, विष्णु वाघमारे, भवर मुडे, प्रकाश कडाळे, नारायण दोडके, तुकाराम जाधव, उत्तम गांगोडे, शांताराम भोये, काशिनाथ पवार, जयराम गावित, लक्ष्मण तुंबडा, पिटु पवार, तुळशिराम खोटरे आदींचा समावेश होता.