
दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori
बाळासाहेबांची शिवसेना (shiv sena) दिंडोरी तालुका (dindori taluka) पदाधिकार्यांची कार्यकारिणी जाहीर (Executive announced) करण्यात आली आहे.
शिवसेना (shiv sena) कार्यालय नाशिक (nashik) येथून दिंडोरी तालुका पदाधिकारी मुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde), खा. श्रीकांत शिंदे, सचिव संजय मोरे, संपर्कनेते मशीलकर, पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse), खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse), आ. सुहास कांदे (MLA Suhas Kande), संपर्कप्रमुख संजय बच्छाव, जयंत साठे, सहसंपर्कप्रमुख राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, महिला जिल्हाप्रमुख लक्ष्मीताई ताडे, तालुकाप्रमुख अमोल कदम यांनी सदर कार्यकारिणी जाहीर केल्या.
त्यात उपतालुकापदी चिंतामण मोरे, (पश्चिम भाग), सोमनाथ वतार, (पूर्व भाग), गटप्रमुखपदी नंदू गटकळ (खेडगाव गट), रमेश झिरवाळ (अहिवंतवाडी गट), उत्तम चौरे (उमराळे गट), गणप्रमुखपदी विशाल दिघे (मडकीजांब गण), सुदाम तुंगार (अहिवंतवाडी गण), युवासेना तालुका अधिकारीपदी दिपक बेजेकर, दिंडोरी शहरप्रमुख पदी निलेश शिंदे, उपशहर प्रमुखपदी रोशन जाधव आदींची निवड करण्यात आली आहे.
यावेळी तालुकाप्रमुख अमोल कदम यांनी सांगितले की, ही कार्यकारिणी आगामी जिल्हा परिषद (zilha parishad), पंचायत समिती (panchayat samiti), बाजार समिती निवडणूकांसाठी (election) तयारीला लागले आहे. बाळासाहेब शिवसेना तालुक्यात प्रबळ झाले आहे. येत्या काही दिवसात तालुक्यातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते बाळासाहेब शिवसेना या पक्षात प्रवेश करणार असल्याचे तालुकाप्रमुख अमोल कदम यांनी सांगितले.