
सिन्नर । वार्ताहर | Sinnar
येथील शासकीय विश्रामगृहावर नुकतीच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या (Balasaheb's Shiv Sena party) पदाधिकार्यांची बैठक पार पडली.
यावेळी काही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख संजय बच्छाव (District Liaison Chief Sanjay Bachhao) अध्यक्षस्थानी होते. जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, युवा जिल्हाप्रमुख सदानंद नवले, मागासवर्गीय सेल जिल्हा प्रमुख दत्ता ससाने यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी आदित्य चकणे, रंगा सोनवणे यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी आगामी निवडणूकांविषयी चर्चा करण्यात आली. तालुक्यात बेरोजगारांचा प्रश्न बिकट आहे. त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न करणार असल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले.
घरा-घरापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहचवण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन बच्छाव यांनी केले. शरद शिंदे यांनी पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी निलेश जुंदरे, कन्हैया धनगर, निवृत्ती फणसे, नितीन पवार, उत्तम जाधव, अक्षय दळवी, किरण गायकर, अशोक सोनवणे, आकाश हटकर, आकाश धनगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.