नाशकात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून राहुल गांधींच्या फोटोला 'जोडे मारो' आंदोलन

नाशकात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून राहुल गांधींच्या फोटोला 'जोडे मारो' आंदोलन

नाशिक | Nashik

काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रे (Bharat Jodo Yatra) दरम्यान स्वातंत्रवीर सावरकर (Swatantraveer Savarkar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याने या विरोधात नाशकात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून (Balasaheb ShivSena) राहुल गांधी यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला...

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नाशिक जिल्ह्यात आली तर त्यांना जसेच तसे उत्तर देऊ असा इशारा बाळासाहेबांच्या शिवसेना गटातील महिला पदाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आला आहे. राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कुठलाही इतिहास माहित नसतांना त्यांनी अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करणे चुकीचे असल्याच आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या आंदोलनाप्रसंगी जिल्हाप्रमुख अनिल ढिकले (Anil Dhikle) भाऊलाल तांबड, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, उपजिल्हा प्रमुख शिवाजी भोर, मा. नगरसेवक मामा ठाकरे, सुधाकर जाधव, मा. नगरसेवक श्याम साबळे, युवासेना जिल्हाप्रमुख सदानंद नवले, जिल्हाप्रमुख महिला आघाडी लक्षमिताई ताठे, शहरप्रमुख महिला आघाडी अस्मिता देशमाने, उपमहनगर प्रमुख कोमल साळवे, जिल्हाप्रमुख सोशल मीडिया विलास बोराडे, शहरप्रमुख सोशल मीडिया सागर चौधरी, अजय पंडित, स्वप्नील पांगरे, शंकर पांगरे, राजेंद्र मोहिते आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com