शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमनपदी दिवटे, व्हा. चेअरमनपदी चौधरी

शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमनपदी दिवटे, व्हा. चेअरमनपदी चौधरी

दिंडोरी | Dindori

दिंडोरी तालुका (Dindori Taluka) शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमनपदी बाळासाहेब दिवटे (Balasaheb Divate) तर व्हा. चेअरमनपदी मनोहर चौधरी (Manohar Chaudhary) यांची बिनविरोध निवड झाली आहे...

निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने, सहाय्यक मिलिंद परदेशी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया होऊन चेअरमनपदासाठी बाळासाहेब दिवटे व व्हा. चेअरमनपदासाठी मनोहर चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी माजी चेअरमन दिलीप जाधव, माजी व्हा. चेअरमन खंडेराव संधान, बाळासाहेब जाधव, गंगाधर निखाडे, बाळासाहेब गायकवाड, रामदास पिंगळ, पुंडलिक धात्रक, रमेश मवाळ, राजाराम सोनवणे, भरत कड, रघुनाथ गायकवाड, विमल हरिकमहाले, वैशाली नाठे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com