बकरी ईद साठी आणलेले बोकड
बकरी ईद साठी आणलेले बोकड
नाशिक

कुर्बानीसाठी लागणारे जिवंत बोकड किलोवर

ईद-उल-अजहा तयारी अंतिम टप्प्यात; 1 ऑगस्ट ला सण

Farooque Pathan

Farooque Pathan

जुने नाशिक | प्रतिनिधी

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बकरी सणाच्या पार्श्‍वभूमीवर शहर परिसरात विविध ठिकाणी कुर्बानीसाठी लागणाऱ्या बोकडांची आवक झाली आहे. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन खरेदी विक्री देखील होत आहे. दरम्यान, थेट जिवंत बोकडा देखील किलोवर मिळत असल्यामुळे भाविकांची एक प्रकारे सोय झाली आहे.

अल्ला होत आलाच्या मार्गात त्याग व कुर्बानीची शिकवण देणारा तसेच इस्लाम धर्माचे जेष्ठ धर्मगुरू हजरत इब्राहिम अलेहसलाम व हजरत इस्माईल अलेहसलाम यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ मुस्लिम बांधव बकरी ईदचा सण साजरी करतात.

येत्या एक ऑगस्ट रोजी हा मोठा सण साजरा होणार असून करोनाच्या पार्श्वभूमीवर ईदगाह तसेच मशिदीमध्ये विशेष सामुदायिक नमाज पठण करण्याची परवानगी नसल्यामुळे मुस्लिम बांधव घरीच नमाज पठण करून कुर्बानी देणार आहे.

कुर्बानीसाठी लागणारे बोकड यांची आवक शहर परिसरात झाली आहे. वडाळा मोहम्मद अली रोड तसेच मिरजकर नगर आदी भागात लहान-मोठ्या बोकड विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. या बोकडांचे फोटो सोशल मीडियावर टाकून त्यावर संपर्क क्रमांक देण्यात येत आहे.

दरम्यान, कमी वेळेत व्यवहार पूर्ण व्हावे या अनुषंगाने यंदा जिवंत बोकडे देखील किलोवर मिळत आहे. यामुळे भाविकांची देखील एक प्रकारे सोय झाली आहे, कुर्बानीसाठी शारीरिक दृष्ट्या चांगला व कोणत्याही प्रकारे डाग नसलेला जनावर लागतो तर जे बोकड विक्रीसाठी आले आहेत ते कुर्बानीसाठी पात्र असून त्यांचीच विक्री होत आहे.

दरम्यान, ईदच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात पोलिस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहेत, सण उत्सव शांततेत साजरे व्हावे व कोणीही कायद्याचा भंग करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com