बैलपोळा
बैलपोळा
नाशिक

बैलपोळा : पाठीवरती हात ठेवूनी नुसते लढ म्हणा...

पिंपळगाव खांब येथे बैलपोळा साजरा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

पिंपळगाव खांब येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपळगाव खांब येथील शेतकरी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर बैल जोडीच्या पाठीवर लढण्याची प्रेरणा देणारा संदेश लिहून बळीराजाच्या कष्टाची जाणीव करून दिली.

करोनामुळे मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवूनी नुसते लढ म्हणा.... मग बघा...ताकद माझ्या बळीराजाची. असा प्रेरणादायी संदेश देऊन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रामकुंड परिसरात, कृषीउत्पन्न बाजार समिती परिसरातही बैलांना सजवून मिरवणूक काढण्यात आली. त्याचप्रमाणे शहर परिसरातील पाथर्डी, पिंपळगाव खांब, दाढेगाव, वडनेर दुमाला, म्हसरूळ, गंगापूर, सातपूर, अंबड, कामटवाडे, आडगावमध्येही बैलांची पारंपरिक पद्धतीने बैलांची सजावट करून बैलांचे पूजन करण्यात आले.

शहर परिसरात शेतीच्या आधुनिकीकरणामुळे बैलांच्या संख्येत घट झाल्याने अनेक कुटुंबांतील महिलांनी घरोघरी मातीच्या बैलांची तसेच घरासमोरून जाणा-या मिरवणुकीतील बैलांचे पूजन व औक्षण केले, तर काहींनी गावातील हनुमान मंदिरासमोर सलामीसाठी येणाऱ्या बैलांना पुरणपोळी भरवून त्यांचे पूजन केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com