बागलाण रोटरी पदाधिकार्‍यांचे पदग्रहण

बागलाण रोटरी पदाधिकार्‍यांचे पदग्रहण
Dipak

सटाणा । प्रतिनिधी | Satana

रोटरी क्लब ऑफ सटाणा (Rotary Club of Santana) बागलाणच्या (baglan) नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ येथील सुर्या लॉन्समध्ये संपन्न झाला. यावेळी अध्यक्षपदी नितीन मगर (Nitin Magar as President) तर सेक्रेटरीपदी डॉ. प्रसाद सोनवणे (Dr. as Secretary. Prasad Sonawane) यांची नियुक्ती झाली. मावळते अध्यक्ष उमेश सोनी व सेक्रेटरी नितीन मगर यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांकडे पदभार सुपूर्द केला.

पदग्रहण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून माजी प्रांतपाल डॉ. बाळ इनामदार, डॉ. चंद्रशेखर सिकची, संग्रामसिंग भोसले, के.एस. राजन, राजेंद्र भामरे, उपप्रांतपाल दिलीप ठाकरे, प्रदीप बच्छाव, क्लबचे चार्टर प्रेसिडेंट प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी रोटरी सदस्यांनी आपले व्यक्तिगत जीवन आनंददायी करून समाजासाठी सेवाभाव अर्पण करण्याचे आवाहन रोटरी डिस्ट्रीक्टचे प्रांतपाल रमेश मेहेर यांनी केले. क्लबला 21 वर्ष पूर्ण होत असून सलग 1100 वी सभा उत्सव स्वरूपात होणे ही ऐतिहासिक घटना आहे. क्लबने आरोग्य (health), शिक्षण (education), पर्यावरण (environment) आदी क्षेत्रात अनेक यशस्वी उपक्रम राबवले असल्याचे सांगून क्लबतर्फे सुरु असलेल्या मोफत डायलेसिस योजनेचा प्रांतपाल मेहेर यांनी गौरव केला.

क्लबच्या मोफत डायलेसिस युनिटमुळे (Free dialysis unit) अनेक गरजू व गरीब रुग्णांना लाभ मिळत असल्याने माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे (Former Governor Rajendra Bhamre) यांनी या उपक्रमासाठी 21 हजार रुपये देणगी दिली. बागलाणचे उद्योजक विलास बिरारी (Entrepreneur Vilas Birari) यांनी रोटरी फाऊंडेशनला 1500 डॉलर्स म्हणजे 1 लाख 14 हजार रूपये देवून समाजातील दानशूरांना या उपक्रमाच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

उमेश सोनी, नितीन मगर आदींनी मनोगत व्यक्त केले. योगेश अहिरे यांनी क्लबच्या आजवरच्या कार्याची ध्वनिचित्रफीत उपस्थितांसमोर सादर केली. डॉ. प्रसाद सोनवणे यांनी प्रास्ताविक तर डॉ. अंजली जगताप व सोपान खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी क्लबचे नूतन सदस्य अ‍ॅड. मनीषा पवार, सुनीता शेवाळे, रुपाली सोनवणे, मयुरा पाटील, डॉ. सुमित गुंजाळ यांना मान्यवरांच्या हस्ते क्लबची पीन प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमास नाशिक (nashik), मालेगाव (malegaon), कळवण (kalwan), देवळा (deola), सटाणा (satana) येथील विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच रोटरी क्लब ऑफ सटाणाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. प्रकाश जगताप, मनोज जाधव, रामदास पाटील, शांताराम गुंजाळ, उपप्रांतपाल बी.के. पाटील, प्रा. बी.डी. बोरसे, उमेश बिरारी, प्रशांत भामरे, महेश सूर्यवंशी, योगेश अहिरे, अभिजित सोनवणे, डॉ . मनोज शिंदे, सचिन भामरे, डॉ. अमोल पवार, जगदीश कुलकर्णी, डॉ. प्रसाद सोनवणे, समीर पाटील, डॉ. प्रशांत गुंजाळ, कुलदीप जाधव, राजेश सोनवणे, अभिजित निकम, यशवंत पाटील, रोहित शिंदे, नीलेश डांगरे, प्रवीण सूर्यवंशी, आशिष सोनवणे, अभिजित रौंदळ, कुणाल सोनवणे आदींसह रोटरॅक्ट सदस्य उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com