बागलाण सायकलिस्टचा ओंजळभर पाणी, मुठभर धान्य उपक्रम

बागलाण सायकलिस्टचा ओंजळभर पाणी, मुठभर धान्य उपक्रम

सटाणा । प्रतिनिधी Satana

उन्हाळ्यात (summer) पक्ष्यांना (birds) जगणे सुसह्य व्हावे म्हणून बागलाण सायकलिस्टच्या (Baglan cyclist) वतीने पक्ष्यांसाठी ‘ओंजळभर पाणी, मूठभर धान्य’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बागलाण सायकलिस्टच्या माध्यमातून पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ठिकाणी झाडांना मातीचे भांडे टांगून पाणी व धान्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

तालुक्यातील भाक्षी डोंगर परिसरात सदर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थांना सहभागी करुन घेत त्यांना पालकत्व देण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्णता (heat) वाढत आहे. त्यामुळे पाण्याअभावी पक्षी बेशुद्ध पडून मृत्युमुखी पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. पक्ष्यांना उन्हाळ्यात नैसर्गिक खाद्य (Natural food) दुर्मिळ होत असते. तसेच तीव्र उन्हामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोतही (Natural source of water) दिसेनासे होतात. आगामी महिनाभरात उन्हाळा (summer) अजून तीव्र असणार आहे.

तेव्हा या मुक्या जीवांसाठी काहीतरी केले पाहिजे, असा विचार बागलाण सायकलिस्टच्या सदस्यांनी केला आणि या उपक्रमाला चालना दिली. धान्यामध्ये गहू (Wheat), तांदूळ (rice), बाजरी (Millet), ज्वारीच्या भरड्याचा समावेश आहे. एखादा पक्षी जखमी अवस्थेत आढळल्यास सावलीत नेऊन त्याला ड्रॉपरने पाणी पाजून प्रथमोपचार करावा. पक्षी जखमी असेल आणि परिस्थिती हाताबाहेर असल्यास जवळील डॉक्टरांशी संपर्क साधा, अशी असे आवाहन बागलाण सायकलिस्टचे अध्यक्ष डॉ. विशाल अहिरे (President of Baglan Cyclists Dr. Vishal Ahire) यांनी यावेळी केले.

सदर उपक्रमात बाळासाहेब देवरे, मोहन सूर्यवंशी, रवींद्र भदाणे, महेंद्र महाजन, मोहन सोनवणे, हेमंत भदाणे, चंद्रशेखर देवरे, दीपक सोनवणे, हितेश देसले, नितीन जाधव, प्रशांत रौंदळ, वैभव पाटील, वैष्णव बच्छाव, श्वास अहिरे, राजेंद्र सोनवणे, विकी खरोटे, मयूर जाधव, सुदर्शन सोनवणे, ओम सोनवणे, सिद्धेश भदाणे आदिंनी सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.