एमजी रोडला लाखाची बॅग लंपास

एमजी रोडला लाखाची बॅग लंपास

नाशिक | Nashik

चारचाकी गाडीचे ऑईल गळत असल्याची बतावणी करून चालक खाली उतरताच गाडीत ठेवलेली १ लाख रूपयांची बॅक भामट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.५) भर दुपारी शहरातील महात्मागांधी रोड या गजबजलेल्या भागात घडली.

याप्रकरणी रामचंद्र नामदेव जाधव (रा. सिताराम निवास, उत्तरानगर, बोधलेनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार जाधव हे त्यांच्या पुतनण्यासह एमएच २०, ईयु ३०० या चारचाकी वाहनाने महात्मागांधी रोड येथे आले होते.

जाधव कामासाठी एका कार्यालयात गेल्यानंतर त्यांचा पुतण्या गाडीत बसून होता. इतक्यात दोघांनी गाडीचे ऑईल रस्त्यावर सांडत असल्याचे त्यास सांगीतले. यामुळे तपासणी करण्यासाठी पुतण्या गाडीच्या खाली उतरून त्याने गाडीचे बोनेट उघडले, तोपर्यंत भामट्यांनी गाडीचा दरवाजा उघडून गाडीत ठेवलेल्या २ काळ्या रंगाच्या बॅग ज्यामध्ये १ लाखाची रोकड व महत्वाचे कागदपत्र होते ते लंपास केले.

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com