पेठ रुग्णालय
पेठ रुग्णालय
नाशिक

पेठ ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवा सलाईनवर

नागरिक संतप्त

Gokul Pawar

Gokul Pawar

पेठ | Peth

पेठ ग्रामीण रुग्णालयात आलेल्या गरोदर महिलेला गंभीर रुग्ण म्हणुन नाशिकला पाठवण्यात आले. या महिलेची प्रसुती सामान्य झाल्याने समाधान पसरले आहे. परंतु पेठ ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवा मिळत नसल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे.

पेठ तालुक्यातील मोहाचापाडा (कुंभाळे ) येथील कमल तुषार राऊत ही महिला प्रसुतीसाठी कुंभाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवार (दि.5) ऑगस्ट रोजी रात्री दाखल झाली. तेथे उपचार करण्याऐवजी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे रात्री 2 वाजेदरम्यान कुठलीही दखल न घेता जिल्हा रुग्णालयाकडे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात सकाळी कमल कुठलेही उपचार न करताच प्रसुत झाली. या प्रकरणात कुठलीही गुंतागुत नसतांना संबधितांनी आपली जबाबदारी टाळली असली तरीही प्रसुत महिलेस व महिलेच्या नातेवाईकांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र या प्रकरणातील संतापजनक प्रकार अजुनही बाकी असुन जिल्हा रुग्णालयात करोनाच्या पार्श्वभूमी करोनाच्या उपद्रवामुळे उपचारानंतर रुग्णास सुरक्षितता म्हणून सोडून देण्याच्या पार्श्वभूमीवर डिस्चार्ज देतांना 2 ते 3 दिवस पेठच्या रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला . मात्र कमल राऊत यांना पुन्हा दाखल करुण घेण्यास ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरानी व विशेषताः वाघ यांनी नकार दिल्याचा आरोप रुग्ण व त्यांचे नातेवाइक यांनी केला आहे.

झालेल्या गोंधळाची कुणकुण पंचायत समिती सभापती विलास अलबाड, सदस्य तुळशीराम वाघमारे, श्यामलाल गावीत, मोहन कामडी यांना लागताच त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनास त्या बाबत जाब विचारल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com