Video Story : हरसूल वाघेरा घाटातील कठड्यांची दुरावस्था

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
Video Story : हरसूल वाघेरा घाटातील कठड्यांची दुरावस्था

हरसूल | Harsul

हरसूल- वाघेरा घाट वाहतुकीसाठी सध्या धोकादायक ठरत आहे. येथील संरक्षक कठड्यांची दुरावस्था झाली असून यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

पावसाळ्यात हरसूल वाघेरा घाटाला हिरवाईचे कोंदण लाभत असते. यामुळे येथील निसर्ग नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. परंतु अनेकदा या ठिकाणी दरडी, माती कोसळल्या च्या घटना घडल्या आहेत. दरम्यान अनेकदा अपघातही झाले आहेत. अनेक ठिकाणी लोखंडी संरक्षक कठडे बांधण्यात आलेत तर अनेक ठिकाणी सिमेंट कठडे कोसळण्याच्या मार्गावर आहेत. तर काही ठिकाणी रोडलागत असणारी झाडे उन्मळून पडण्याच्या स्थितीत आहेत.

हरसूल तसेच गुजरात कडे जाण्यासाठी येण्याजाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या घाटातून जड व इतरही वाहने ये जा करत असतात. परंतु घाटातील कठडे हे तुटले आहेत व हे कठडे ढासळण्याच्या स्थितीत असल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. घाटातील धोकादायक ठिकाणाची व नादुरुस्त काठड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक व वाहनधारकांना केली आहे.

पर्यटकांचा राबता

सध्या पावसाळी पर्यटनासाठी अनेक पर्यटक वाघेरा घाटात येत आहेत. त्यामुळे अनेकदा रस्त्यात वाहने थांबलेली असतात. परिणामी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

लक्ष देण्याची गरज

वाघेरा घाट जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्यटनासाठी दरवर्षी येत असतो. परंतु अद्यापही या घाटातील धोकादायक ठिकाणांची परिस्थिती जैसे थे आहे. प्रशासनाने या घाटाची डागडुजी करावी, पर्यटकांना आवर घालण्यासाठी उपाययोजना करावी. जेणेकरून येथील निसर्ग सौंदर्य अबाधित राहील.

- शिवदास दोंदे, पर्यटक नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com