सिन्नर-घोटी महामार्गाची दुरवस्था; वीटा, दगड टाकून खड्डे बुजवण्याचा प्रकार

सिन्नर-घोटी महामार्गाची दुरवस्था; वीटा, दगड टाकून खड्डे बुजवण्याचा प्रकार

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

सिन्नर-घोटी महामार्गावर (Sinnar-Ghoti highway) सिन्नरजवळील मातोश्री हॉटेलपरिसरात जागोजागी खोल खड्डे (potholes) पडल्याने पसिररात अपघातांचे (accidents) प्रमाण वाढत आहे.

परिसरात राहणार्‍या नागरिकांनाही येथून ये-जा करणे धोकादायक बनल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संबधित ठेकेदाराकडून खड्डे डांबराने बुजवण्याऐवजी विटा (Bricks), सिमेंट पाईपचे तुकडे, दगड व मातीने बुजवत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

डुबेरे नाक्यापासून अवघ्या अर्ध्या किमी अंतरावर शिवनदीच्या पुढे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे (potholes) की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती आहे. शिवनदीचा पूल पार केल्यानंतर याठिकाणी रस्त्यावर मोठे वळण आहे. शिवनदीपासून ते हुसेनबाबा पर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे झाले आहेेत. खड्डेही खोल असल्याने यात अडकून अनेक दुचाकीचालकांचे अपघात झाले आहेत.

रात्रीच्यावेळी हे खड्डे (potholes) दिसत नसल्याने अनेक वाहनांचे अपघात होऊन जखमीही झाले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला राहणार्‍या नागरिकांनाही येथून-जा करणे अवघड झाले आहेत. नुकतेच रुग्णांला दवाखान्यात नेताना गणेश काकड यांच्या रुग्णवाहिकेचाही (Ambulances) या खड्ड्यांमुळे अपघात होता होता वाचला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (Public Works Department) अनेकदा तक्रारी करुनही यावर कुठलेही पाऊसले उचलली जात नाही.

पावसाने (rain) हे खड्डे अधिक रुंद व खोल झाल्याने अपघात (accidents) होऊन एखाद्याचा मृत्यूही होण्याची शक्यता आहे. संबंधित ठेकेदाराकडून हे खड्ड्यांची कायमस्वरुपी डागडूजी करणे आवश्यक असताना त्यांच्याकडून खड्ड्यांत वीटांचे तुकडे, सिमेंटच्या पाईपचे तुकडे, दगड टाकून बूजवण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. मात्र, यामुळे हा रस्ता अधिकच धोकादायक बनणार असून बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दूरुस्ती करावी अशी मागणी सोपान लोणारे, राजेंद्र लोणारे, दत्तात्रय लोणारे, सुदर्शन लोणारे, ज्ञानेश्वर लोणारे, ज्ञानेश्वर झगडे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com