नाशिक तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची चाळण

नाशिक तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची चाळण

नाशिक । Nashik

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे (Heavy rain) नाशिक तालुक्याला (Nashik Taluka) जोडणाऱ्या रस्त्यांची अक्षरश: चाळण (damage Roads) झाली असून, अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत. पावसात मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला; परंतु जोराच्या पावसामुळे हा मुरुमदेखील वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी मुरमामुळे रस्त्यावर चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणार्‍या रस्ते खड्ड्यात गेले असून वाहतुकीचे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत. अनेक रस्त्यांवर जीवघेणे खड्डेच खड्डे दिसत असल्याने या रस्त्यांना कुणी वाली नाही का असा प्रश्न वाहनधारक करत आहेत. दरम्यान नाशिक शहर (Nashik City) तसेच तालुक्याला जोडणाऱ्या गिरणारे-दुगाव-गोवर्धन-गंगापूर (Girnare-Gangapur Road) रहदारीचा मुख्यमार्ग, मुंगसरा फाटा-चांदशी-आनंदवल्ली रस्ता (Anandwalli road), दरी-मातोरी रस्ता, मुंगसरा-दरी रस्त्यावरची धोकेदायक कठडे व पूल ढासळले आहेत. तर हरसूल-गिरणारे-नाशिक (Harsul Nashik Road) मुख्य रस्ता खड्ड्यांत गेला आहे. अनेक ठिकाणी छोटे पुलाचे कठडे ढासळले असून मातीचा भराव रस्त्यांवर पसरला आहे.

या रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात (accidents) झाले आहेत. वाहन धारकांना या रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागत आहे. अनेक मोटार सायकलस्वार वाहन चालविताना आदळून आदळून कंबर दुखीचे दुखणे ओढवून घेत असल्याचे सांगत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com