मुंगसरा
मुंगसरा
नाशिक

मुंगसराफाटा ते चांदशी रस्त्याची चाळण

रस्त्यावर खड्ड्यांची सत्ता

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

मुंगसरा- चांदशी रस्त्याची गेल्या ३ वर्षांपासून अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून जागोजागी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहेत.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले. त्याचप्रमाणे दरी-मातोरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या दोन्ही रस्त्यांच्या समस्यांबाबतचे निवेदन उद्या सोमवारी (दि.२४)रोजी ग्रामविकास संवादमंच वतीने देण्यात येणार आहे.

शहरापासून १२ किलोमीटर अंतरावरील मुंगसरा-चांदशी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. या मुख्य रस्त्यावरून शेतकरी, विद्यार्थी, कामगार यांचा सातत्याने प्रवास असतो मात्र रस्त्याची ठिकठिकाणी चाळणी झाल्याने पूर्ण रस्ताच उखडला आहे. अशावेळी रस्त्यावर आम्ही दळणवळण कसे करायचे?असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मुंगसराफाटा ते चांदशी रस्त्यावरून मोठया प्रमाणात वाहतूक असते. परंतु सद्यस्थितीला रस्त्याला खड्डे पडले आहेत. लवकरच निवेदन देतोय कार्यवाही केली नाही तर थेट रस्त्यावरील वरील खड्ड्यात बसून आंदोलन केले जाईल असा इशारा आम्ही देत आहोत.

- ऍड प्रभाकर वायचळे, संयोजक, ग्रामविकास संवाद मंच

दरी-मातोरी सह मुंगसरा ते चांदशी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील शेतकरी वर्गाला शेतमाल ने आण करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा निवेदने देऊनही स्थानिक लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

- बाळासाहेब म्हैसधूने, प्रयोगशील शेतकरी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com