‘तो’ खड्डा बनला अपघात प्रवण

‘तो’ खड्डा बनला अपघात प्रवण

हरसूल । वार्ताहर Harsul

हरसूल - नाशिक महामार्गावरील (Harsul - Nashik Highway) हरसूल ग्रामीण रुग्णालयाच्या (Harsul Rural Hospital) समोर पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यामुळे अनेक दुचाकी स्वारांना अंदाज येत नसल्याने चिखलात पडण्याची वेळ आली असून खड्डा (Pothole)अपघात प्रवण बनला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने (Department of Public Works) महामार्गाची झालेली दयनीय दुरवस्था थांबविण्याची मागणी हरसूल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर यांच्यासह उपसरपंच राहुल शार्दूल, सामजिक कार्यकर्ते अनिल बोरसे आदींनी केली आहे. हरसूल - नाशिक महामार्गावर अनेक लहान- मोठ्या खड्ड्यानी जागा निर्माण करत वर्चस्व गाजविले आहे.

यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावरील साप्ते, कोणे पासून ते हरसूल शहरालगत जागोजागी खड्डे पडले आहे. त्याचबरोबर वाघेरा घाटाच्या साईट पट्यांची तसेच संरक्षक भिंतीची दुरवस्था होऊन अपघात प्रवण बनल्या आहे. याच महामार्गावरील हरसूल ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील बाजूस एका मोठ्या खड्ड्याने वर्चस्व निर्माण केल्याने दुचाकी स्वारांना या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने चिखलात पडण्याची वेळ आली असून अपघातही घडले आहेत.

एकूणच हरसूल शहरात विविध कामासाठी तसेच आरोग्य सेवेच्या दृष्टीने नेहमीच हरसूल ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात गर्दी पहावयास मिळते. या पडलेल्या खड्यामुळे एका दुचाकीस्वार शिक्षिका महिलेस खड्ड्याचा अंदाज न आल्याने खड्ड्यात पडून किरकोळ जखमी होण्याची वेळ आली. खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर, उपसरपंच राहुल शार्दूल, अनिल बोरसे, अशोक लांघे आदींनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com