नांदगाव : बोलठाण रस्त्याची चाळण, वाहनधारकांची कसरत
नाशिक

नांदगाव : बोलठाण रस्त्याची चाळण, वाहनधारकांची कसरत

Gokul Pawar

Gokul Pawar

बोलठाण | Bolthan

नांदगाव तालुक्यातील बोलठाण सह परिसरात जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्याचे अक्षरशः बारा वाजले आहे.

दरम्यान हा सुविधेसाठी वारंवार निवेदन, मागणी केल्यानंतरही याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे.

बोलठाण हे नाशिक जिल्ह्याचे शेवटचे टोक असल्याने चाळीसगाव, कन्नड, वैजापूर या शहरांच्या हद्दी जोडल्या गेल्या आहेत. रस्ता खराब झाल्याने वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनासह स्थानिक लोक प्रतिनिधीनी याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com