बाबरी पतन स्मृतीदिन शांततेत

प्रार्थनास्थळात नमाज पठण; विविध संघटनांकडून निषेधाचे निवेदन
बाबरी पतन स्मृतीदिन शांततेत

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

6 डिसेंबर बाबरी मशिद (Babri Masjid) पतन स्मृतीदिन (Memorial Day) शहरात शांततेत पार पडला. दरवर्षी होणारे रस्त्यावरील अजान (ajaan) व नमाज पठनासारखे (Prayer reading) प्रकार यंदा झाले नाही. संवेदनशील किदवाईरोडसह परिसरात सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अनेक व्यापारी तसेच हातगाडी चालकांनी आपली दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत बंद ठेवली होती. कुठलाही अनुचित प्रकार न घडता बाबरी स्मृतीदिन शांततेत पार पडल्याने पोलिस-प्रशासन यंत्रणेसह जनतेने सुटकेचा निश्वास सोडला.

गत महिन्यात त्रिपुरातील (Tripura) कथित हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर येथे पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. दगडफेकीसह (stone pelting) बसस्थानक (Bus station) तसेच व्यापारी प्रतिष्ठानांची मोठ्या प्रमाणात समाजकंटकांतर्फे नासधूस करण्यात आली होती. तर एका दवाखान्यास आग लावून देण्याचा प्रकार घडला होता. पोलिसांना लक्ष्य करण्यात येवून मोठ्या प्रमाणात दगडफेक केली गेल्याने तिघा अधिकार्‍यांसह सात पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले होते.

या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी 9 गुन्हे दाखल करत 52 पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. यामध्ये नगरसेवकांसह राजकीय (Political), सामाजिक व धार्मिक संघटनेच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे. पोलिसांच्या या कारवाईवर पुर्व भागातील राजकीय पक्षांतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर 6 डिसेंबररोजी बाबरी मशिद स्मृतीदिनी अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती.

रस्त्यावर अजान व नमाज पठन होवू नये तसेच निदर्शने करू नये यास्तव नगरसेवकांसह विविध संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांतर्फे नोटीसा बजाविण्याची कारवाई करण्यात आली होती. सोशल मिडियावर (social media) आक्षेपार्ह मजकूर व व्हीडीओ व्हायरल (Video viral) होवू नये यासाठी सायबर सेलतर्फे (Cyber ​​cell) विशेष दक्षता घेण्यात आली होती.

वादग्रस्त पोस्ट (Controversial post) व्हायरल करणार्‍यासह ग्रुप अ‍ॅडमिनवर (Group admin) देखील कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील (District Police Chief Sachin Patil), अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी (Upper Superintendent of Police Chandrakant Khandvi) यांनी दिला होता. त्यामुळे वादग्रस्त मजकूर व्हायरल होवू शकला नाही.

6 डिसेंबरच्या पुर्वसंध्येस काल सशस्त्र पोलिसांतर्फे शहरातील संवेदनशील भागात संचलन काढण्यात येवून शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. आज सकाळपासूनच नवीन बसस्थानक, किदवाईरोड, पेरी चौक आदी भागात सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, अ.पो. अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक लता दोंदे आदी अधिकारी जातीने गस्त घालत शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

पोलीस-प्रशासन यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद देण्यात येवून रस्त्यावर नमाज अथवा अजान देण्याचे प्रकार यंदा घडले नाही. मात्र पावणेचार वाजता प्रार्थनास्थळातून बाबरी मशिदीसाठी नमाज अदा करण्यात येवून दुवॉ पठन मुस्लीम बांधवांतर्फे केले गेले. येथील इन्सानियत बचाव संघर्ष समितीचे संस्थापक माजी आ. आसिफ शेख रशीद यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांना निवेदन सादर केले. राष्ट्रपती तसेच अप्पर जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या या निवेदनात बाबरी मशिद उध्वस्त करण्याच्या घटनेचा निषेध केला गेला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com