काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा

काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा

निफाड । प्रतिनिधी | Niphad

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशासाठी स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणार्‍या क्रांतीकारांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (Maharashtra Pradesh Congress Committee) वतीने आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन (Organizing Azadi Gaurav Padayatra) महाराष्ट्रभर (Maharashtra) करण्यात येत असून

निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या (Niphad Taluka Congress Committee) वतीने या पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते. या आझादी गौरव पदयात्रेची सुरुवात नैताळे (Naitale) येथून करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रध्वज (national flag) हातात घेऊन नैताळे येथील ग्रामस्थ तसेच काँग्रेस कार्यकर्ते (Congress workers) व पदाधिकारी या पदयात्रेत सहभागी झाले. या यात्रेचे स्वागत शिवरे फाटा येथे रघुनाथ सानप यांच्या वतीने करण्यात आले.

आझादी गौरव पदयात्रेचे निफाडच्या शांतीनगर चौफुलीवर आगमन होताच नगरसेविका पल्लवी महेश जंगम (Corporator Pallavi Mahesh Jangam) यांनी या यात्रेचे स्वागत केले. तर निफाड (niphad) पंचायत समिती (panchayat samiti) येथील आवारातील हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) व छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरून पदयात्रा देशाचे थोर विचारवंत, समाज सुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जन्मस्थळी उभारण्यात आलेल्या श्री माणकेश्वर वाचनालयात जावून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधूकर शेलार यांनी प्रास्ताविक केले. तर गुणवंत होळकर व मधूकर राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे (Congress) फार मोठे योगदान आहे. 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून काँग्रेसजन स्वातंत्र्यलढ्यात तन-मन-धनाने सामील झाले. ज्या देशात सुई देखील बनत नव्हती तसेच धान्याची आयात करावी लागत होती अशा देशात लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान चा नारा दिला आणि भारताच्या शेती व उद्योगात भरभराट झाली. अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश स्वावलंबी झाला.

सत्तर वर्षात काँग्रेसने देशाच्या जडणघडणीचे व बांधणीचे कार्य केले हे विसरून चालणार नाही. याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिकांचे वारस उपस्थित होते. कार्यक्रमास भारत टाकेकर, सचिन होळकर, भैय्या देशमुख, गौरव पानगव्हाणे, सचिन खडताळे, स्वप्नील बिनायकिया, रघुनाथ कुंदे, सुनील निकाळे, सोनवणे, माधव निचित, पुंजाराम तासकर, भाऊसाहेब शिंदे, सतिश भालेराव, विनायक देशमुख, विनायक शिंदे, भाऊसाहेब शिंदे ,साहेबराव ढोमसे, युनूस शहा, मधूकर मरडे, सुनील बाफणा, मधुसूदन आव्हाड, संपत कराड,

बाबूलाल थोरात, अली शेख, महेश जंगम, तौसिफ राजे, शेरखान मुलानी, अल्ताफ पठाण, मनोज निरभवणे, गांगुर्डे गुरूजी, संजय बोरगुडे, चंद्रकांत सांगळे, पद्मिनी खडताळे, रेखा पगारे, बाळासाहेब कापसे, राजेंद्र खालकर, सुहास सुरळीकर, सुजाता तनपुरे, प्रवीण तनपुरे, दत्ता उगावकर, बाळासाहेब खालकर, राजेश लोखंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com