अवकाळी, गारपीटीनंतर द्राक्षबागांवर कुर्‍हाड

अवकाळी, गारपीटीनंतर द्राक्षबागांवर कुर्‍हाड

ओझे । विलास ढाकणे | Ozhe

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) मागील आठवड्यांत वादळीवार्‍यांसह पडलेला पाऊस (rain) व गारपीटमुळे (hail) द्राक्ष (grape), गहू (wheat), कादां (onion) उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्यांमुळे अनेक शेतकर्‍यांसमोर (farmers) उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्षभर शेतात कष्ट करून अवकाळी व गारपीटीमुळे क्षणात पिकांचे मोठे (crop damage) नुकसान झाले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी प्रशासनाने पिकांचे पंचनामे (panchanama) केले मात्र या नुकसानगस्त शेतकर्‍यांना मिळणारी शासनाची मदत कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रत्येक वर्षी पडणार अवकाळी पाऊस (Untimely rain), गारपीट यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असून खर्च होणारे भांडवल सुध्दा निघत नाही. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) बहुसंख्य द्राक्ष उत्पादकांनी द्राक्षबागांना कुर्‍हाड (axe) लावली आहे. सतत दोन वर्ष करोना विषाणूच्या (corona virus) संसर्गामुळे द्राक्ष उत्पादकांचे ऐवढे हल्ल झाले कि, पाच ते दहा रुपये प्रतिकिलोने द्राक्ष विकावी लागली तर काही द्राक्ष उत्पादकानी द्राक्ष बांधावर खुडून टाकली. त्यात करोना संसर्गमुळे मजुरांनी घरी राहणे पंसद केल्यामुळे मजुरांची तीव्र स्वरूपाची टंचाई निर्माण होऊन द्राक्षबागा (Vineyard) वेळेस खाली झाल्या नाही.

परिणामी द्राक्षवेलीला विश्रांतीचा कालावधी मिळाला नाही. त्यामुळे द्राक्षवेली अशक्त झाल्या होऊन द्राक्षवेली वरिल काड्यामध्ये गर्भधारणा ज्या प्रकारे व्हायला पाहिजे तसी न झाल्यामुळे चालू वर्षी अनेक द्राक्षबागा माला विना उभ्या राहिल्यां व ज्या द्राक्षबागाना घड निघाले त्या बागांना पुन्हा फ्लोरिंग आवस्थेत अवळाळी पावसाने (Untimely rain) झोडपल्यांमुळे गळ व कुज झाल्यामुळे पुन्हा द्राक्ष उत्पादकाचे मोठे नुकसान झाले. ज्या बागा अवकाळीतून वाचल्या त्यांना चालू महिन्यात झालेल्या वादळीवार्‍यांसह पडलेल्यां अवकाळी पाऊस (rain) व गारपीटीचा (hail) मोठा फटका बसल्यांमुळे शेतकरी (farmers) राजा संपूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

पडलेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा (onion) उत्पादकाचेही नुकसान होऊन विविध रोगाचा कादां उत्पादक सामना करित आहे. या अवकाळीमुळे कादां पिक पिवळे पडले असून काद्यांची वाढ खुंटली आहे. अनेक रासायनिक औषधाच्या फवारण्या सध्या कांदा उत्पादक घेत आहे तर दुसरीकडे सोंगणीला आलेला गहू, हरबरा पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्‍यांनी गारपीटीनंतर त्वरित सोंगणीला सुरवात केली असून गहू, हरभरा पिकांनाही नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा शेतकरी वर्गाला प्रत्येक वर्षी फटका बसत असल्यामुळे शेतकरी वर्गापुढे शेती करावी कि, नाही असा प्रश्न पडला आहे.

या नैसर्गिक आपत्ती व पडलेल्या बाजार भावामुळे बळीराजा दिवसेंदिवस कर्जबाजारी झाला असून शेती व्यवसाय एका धोक्याच्या वळणावर येवून उभा आहे. एकीकडे शेतकर्‍यांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे उत्पादन खर्च, रासायनिक खते, रासायनिक औषधे यांचा वाढलेले बाजार भाव त्या तुलनेत पिकांना भाव मिळत नाही परिणामी बळीराजा कर्जबाजारी होत आहे. सध्या दिंडोरी तालुक्यात सर्वच बॅकाची वसुली पथके फिरताना दिसत आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीनंतर नुकसान होवूनही बॅकानी वसुली थांबवली दिसत नाही. त्यामुळे वर्गामध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

इतर पिकांचे भांडवल द्राक्ष पिकाला खर्च करून योग्य बाजारभाव मिळत नाही. नैसर्गिक आपत्ती, वाढलेली मजुरी, वाढलेल्या रासायनिक खते व औषधाच्या किंमती, यामुळे उत्पादन खर्च वसुल होत नाही. परिणाम सतत कर्जबाजारीपणा वाढत आहे त्यामुळे आम्ही चार एकर द्राक्षबागेला कुर्‍हाड लावण्याचा निर्णय घेतला आहे.

- राहुल जाधव, शेतकरी, करंजवण

वारंवार वातावरणात होणारे बदल त्यांमुळे उत्पादन खर्चात झालेली प्रंचड वाढ, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. परिणामी आम्ही सहा एकर द्राक्षबागेवर गारपीटीनंतर लगेच तिसर्‍या दिवशी द्राक्षबागेवर कुर्‍हाड लावली आहे. पडलेल्या भावमुळे द्राक्षबाग पोसणे परवडण्यासारखे नाही म्हणून कर्जबाजारी होण्यापेक्षा द्राक्षबाग तोडणे योग्य आहे.

- योगेश मालसाने, नुकसानग्रस्त शेतकरी निगडोळ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com