उभ्या द्राक्षबागेवर कुर्‍हाड

उभ्या द्राक्षबागेवर कुर्‍हाड

ओझे । वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) करंजवण (Karanjavan) येथील शेतकरी (farmer) विलास केरू शॉदूल यांनी सततच्या वातावरण बदल (Climate change) व त्यामुळे होणारे नुकसान यामुळे पाच एकर द्राक्षबाग (Vineyard) तोडण्यास सुरुवात केली आहे. करोना (corona) विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन (Lockdown) मध्ये जास्त काळ झाडावर द्राक्ष राहिल्यामुळे द्राक्षवेलीला विश्रांती न मिळाल्यामुळे परिणामी द्राक्षवेली अशक्त होऊन वेलीची गर्भधारणा व्यवस्थित न झाल्यामुळे बागेते घड कमी निघून,

काही वेली घड तर काही द्राक्षवेली उभ्या आशी अवस्था द्राक्षबागेत होती. त्यात अवकाळीमुळे आहे त्या घडाची कुज झाली परिणामी दोन वर्षापासून द्राक्षबागा शेतकरी अंगावर पोषित आहे खर्च परवड नसल्यामुळे तालुक्यात अनेक द्राक्षबागा तुटण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षा कोरोनाची परिस्थिती असताना व लॉकडाउन असल्यामुळे अनेक व्यापार्‍यानी माल भरत नव्हते त्यांमुळे द्राक्ष उत्पादक (Grape growers) हैराण झाले होते त्यात कोरोनामुळे बाहेरील मजुर कामासाठी आले नाही.

याचा मोठा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे सध्या द्राक्ष उत्पादकांनी द्राक्षबागेत मोठी गुंतवणुक करून ठेवल्यामुंळे या द्राक्ष उत्पादक समोर मोठे संकट उभे राहिले आहे. प्रत्येक वर्षी द्राक्षबागाना मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना भांडवल उभे करणे अवघड घेऊन बसले आहे अनेक द्राक्ष उत्पादकांचे कृषीसेवा केंद्राचे पैसे देणे बाकी आहे त्यांमुळे होणारा तोटा सहन होत नसल्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी द्राक्षबागानां कु-हाड लावणे पंसद केले आहे.

रासायनिक खते, औषधे यांचे वाढणारे भाव शेतकर्‍यांना सध्या परवड नाही कारण कोणत्यांच पिकाला शासनाचा हमी भाव नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. बॅक, सोसायटी मध्ये शेतकरी थकबाकीदार झाले आहे. बॅकानी सध्या वसुलीचा तगादा लावला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक हैराण झाला आहे. परिणामी द्राक्ष उत्पादकांना द्राक्ष पिक धोक्याचे वाटू लागले आहे. द्राक्षचा हंगाम जोरात असला तरी अवकाळी, गारपिट शेतकर्‍यांना फटका देवून जात आहे परिणामी शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

- विलास शार्दुल, शेतकरी, करंजवण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com