चापडगाव सोसायटीच्या चेअरमनदी आव्हाड

चापडगाव सोसायटीच्या चेअरमनदी आव्हाड

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील चापडगाव (chapadgaon) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या (Executive Service Cooperative Society) चेअरमनपदी कोंडाजी आव्हाड (Kondaji Awhad as Chairman) तर व्हाईस चेअरमनपदी सुखदेव बोडके (Sukhdev Bodke as Vice Chairman) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संवेदनशील असणार्‍या चापडगावात सोसायटीची निवडणूक (election) ज्येष्ठ व तरुणांनी एकत्र येऊन बिनविरोध पार पाडली. कोंडाजी आव्हाड, बाळासाहेब आव्हाड, सुभाष आव्हाड, सुखदेव बोडके, रामनाथ सांगळे, चंद्रभान आव्हाड, बस्तीराम आव्हाड, पूजा आव्हाड, दामू बोडके, प्रकाश शेळके, हरिभाऊ आगीवले, लक्ष्मीबाई आव्हाड व अलका आव्हाड यांची नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये बिनविरोध निवड झाली.

त्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया (Election process) राबविण्यात आली. पदाधिकार्‍यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. बिनविरोध प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी मदत केल्याचे सांगत नवनिर्वाचित चेअरमन आव्हाड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Stories

No stories found.