आवारे यांचा प्रवास गावासाठी भुषणावह : वाजे

आवारे यांचा प्रवास गावासाठी भुषणावह : वाजे

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे (Namkarna Aware, Chairman of Industrial Cooperative Colony) यांचा गेल्या 40 वर्षापासून असलेला उद्योजकांसोबत दांगडा जनसंपर्क आहे.

सहकारी वसाहतीचे व्यवस्थापक (Manager of Cooperative Colony) ते चेअरमन (chairman) हा प्रवास नक्कीच कुंदेवाडी ग्रामस्थांना भूषणावह व मार्गदर्शन करणारा असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) केले.

तालुक्यातील कुंदेवाडी (Kundewadi) येथील श्री जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची (Shri Jagdamba Mata Rural Non-Agricultural Cooperative Credit Institution) 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व गावातील विविध भुमिपुत्रांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नामकर्ण आवारे होते. औद्योगिक वसाहतीच्या (Industrial estates) माध्यमातून तालुक्यातील स्थानिक बेरोजगारांना (local unemployed) जास्तीत जास्त रोजगार (Employment) उपलब्ध करुनन द्यावा असे आवाहन वाजे यांनी यावेळी केले.

यावेळी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात पार पडली. सभासद लाभांश पतसंस्थेच्या स्वनिधीमध्ये वर्ग या सर्व विषयास सभेने सर्वानुमते मंजुरी दिली. यावेळी कुंदेवाडी व मुसळगावमधील दहावी व बारावीतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा (students) गुणगौरव समारंभ पार पडला. तसेच नामकर्ण आवारे व सुनील कुंदे यांची औद्योगिक सहकारी वसाहतीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी, विठ्ठल जपे यांची स्विकृत संचालक, सिंधुताई आवारे यांची संचालकपदी निवड, कुंदेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक मंडळाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

सर्व भूमिपुत्रांचा सत्कार माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) यांच्या हस्ते करण्यात आला. औद्योगिक वसाहतीच्या चेअरमन पदाची निवड ही उद्योजक सभासदांच्या उन्नतीसाठी विकासासाठी झालेली आहे. वसाहतीच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना, संगणकीय कौशल्य (Computer skills), जीएसटी (GST), कंपनी व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले व्यावसायिक कौशल्य (Professional skills) यासंबंधीचे मोफत प्रशिक्षण देणार आहे.

प्रशिक्षित झालेले बेरोजगारांना सिन्नर औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये कंपनी व्यवस्थापनात रोजगार मिळणार आहे. या सुविधेचा फायदा स्थानिक बेरोजगारांनी घ्यावा असे आवाहन आवारे यांनी केले. कृष्णा मापारी, एकनाथ महाराज गोळेसर, राजाराम नाठे, रतन नाठे, चंद्रकांत माळी, भास्करराव नाठे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे चेअरमन अशोककुमार खरात, कमलाकर पोटे, सुभाष गायकवाड, रोहित गंगावणे, गणपत माळी, रामभाऊ माळी, रामेश्वर गोळेसर, नारायण शिरसाट, शोभा तांबे, अनीता आसावा यांच्यासह सभासद उपस्थित होते. सूत्रसंचलन अरुण पोटे यांनी केले. आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन विलास नाठे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com