मशिदीच्या भोंग्यावरून होणार जनजागृती

पोलिसांकडून मौलानांचे सत्कार
मशिदीच्या भोंग्यावरून होणार जनजागृती

जुने नाशिक । प्रतिनिधी

संपूर्ण रमजान महिना तसेच ‘ईद-उल-फित्र’ चा मोठा सण अत्यंत शांततेत निर्विघ्नपणे साजरा झाल्याबद्दल सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या वतीने खतीब-ए-नाशिक हााफिज हिसामुुद्दीन अशरफी, काझी ए शहर तसेच परिसरातील मौलाना यांचा सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

सुमारे 14 तास रोजा ठेवून उपाशीपोटी राहणारे भाविकांनी संपूर्ण रमजान महिना शासनाच्या सूचनांचेे पालन केले. दरवर्षी पहाटे तसेच सायंकाळच्या सुमारास मुस्लीम बहुल भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते तर रात्री उशिरापर्यंत खाण्यापिण्याचे दुकाने सुरू असतात. मात्र मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही शासनाने नियम लावून लॉकडाऊन केले होते. ज्यामुळे मुस्लीम समाजाने यंदाही सलग दुसर्‍या वर्षी संयमाची भूमिका घेत शासनाच्या सूचनांचे पालन करीत रमजान महिना व रमजान ईद सण साजरा केला.

शुक्रवारी झालेल्या ईदच्या दिवशी देखील कुठेही ताण तणाव न होता शांततेत सर्व धार्मिक विधी पार पडला. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात होता, मशिदींमध्ये तसेच कब्रस्तान व दर्गा शरीफ या ठिकाणीदेखील मुस्लीम समाजाच्या जबाबदार लोकांनी पुढाकार घेऊन अत्यंत शिस्तीने सर्व कार्यक्रम करून घेतले.निवडक लोकांमध्ये झालेल्या या कार्यक्रमांमध्ये वादविवाद न झाल्यामुळे पोलिस प्रशासनाने समाधान व्यक्त केले, दरम्यान अधिक तर धार्मिक विधी व सणाचे कार्यक्रम मुस्लीम बांधवांनी घरातच केल्यामुळे बाहेर ताण पडला नाही, म्हणून मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या वतीने परिसरातील उलेमा मंडळी यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान लॉकडाऊन बाबत लोकांमध्ये यापुढे अधिक जनजागृती व्हावी तसेच शासनाच्या सूचनांचे प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी मशिदींच्या भोंग्यावरून मागील वर्षीप्रमाणे आताही सतत सूचना करण्याचे आवाहन पोलिस विभागाने मौलाना मंडळींकडे केले आहे. यामुळे मशिदीच्या भोंग्या वरून आता जनजागृती होणार आहे. मागच्या वर्षी देखील याच पद्धतीने जनजागृती झाल्यामुळे त्याचा चांगला परिणाम दिसून आला होता.

पोलिसांना शीरखुर्मा

शुक्रवारी मुस्लीम बांधवांनी मोठा सण ईद-उल-फित्र साजरा केला. यानिमित्त मुस्लीम बहुल भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आपल्या घराबाहेर पोलीस बांधव उभे असल्याचे पाहून अनेक ठिकाणी मुस्लीम बांधवांनी पोलिसांना शिरखुरम्याचा प्रसादसह चहा व पाणी देत एक चांगला संदेश दिला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com