
निफाड । प्रतिनिधी | Niphad
द्राक्षमाल व्यवहार करणारे व्यापारी व शेतकरी (farmers) यांच्यातील व्यवहार कायद्याच्या चौकटीत राहुनच झाले पाहिजे. दरवर्षी होणार्या फसवणुकीच्या (Fraud) प्रकाराला आळा बसविण्यासाठी शेतकर्यांचे प्रबोधन (Awakening of farmers) केले जाईल.
तसेच फसवणूक करणार्या कारवाईसाठी कठोर पाऊले उचलली जातील असे नाशिक (nashik) परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर (Special Inspector General of Police B.G. Shekhar) यांनी स्पष्ट केले. निफाड (niphad) येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आयोजित पोलिस प्रशासन, द्राक्ष बागायतदार संघ, बाजार समिती प्रतिनिधी बैठकीत ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी देशांतर्गत व देशाबाहेरील द्राक्षमाल व्यवहारात होणारी फसवणुकीबाबत मत मांडत पोलीस प्रशासनाकडून द्राक्ष बागायतदारांचे प्रबोधन करावे. व्यापारी वर्गाची माहिती, पायलट, सर्व्हीस प्रोव्हाईडर यांची माहिती नोंदविण्याची मागणी केली तर द्राक्ष बागायतदारांचे द्राक्षमाल व्यवहार हे कायद्याच्या चौकटीत येण्यासाठी सौदा पावतीचा मसुदा देखील मांडण्यात आला.
याबाबत जानेवारी महिन्यातच द्राक्ष बागायतदारांचा प्रबोधन महामेळावा घेऊन त्याबाबत जागृती केली जाईल असेही शेखर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, निफाडचे पोलीस उपाधिक्षक सोमनाथ तांबे, द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय संचालक अॅड.रामनाथ शिंदे, लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सचिव संजय लोंढे, लासलगाव बाजार समितीचे सह सचिव प्रकाश कुमावत, पत्रकार अॅड.शेखर देसाई, उमेश पारिख आदींसह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
द्राक्ष बागायतदारांची द्राक्षमाल खरेदी विक्रीच्या व्यवहारात व्यापारी निर्यातदार यांचेकडून फसवणूक होत असून त्याबाबत पोलीस प्रशासनाने कठोर भमिका घेण्याचे निवेदन दिले. त्यास प्रतिसाद म्हणून बागायतदार संघ, बाजार समिती पोलीस प्रशासन व शेतकरी यांचा संयुक्त प्रबोधन मेळावा घेण्याचे नियोजन केले जाणार आहे.
- कैलास भोसले, उपाध्यक्ष म. रा. द्रा. बा. संघ पुणे विभाग नाशिक