आत्महत्या रोखण्यासाठी सायकल रॅलीद्वारे प्रबोधन

आत्महत्या रोखण्यासाठी सायकल रॅलीद्वारे प्रबोधन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आत्महत्या suicide ही एक जागतिक समस्या असून दिवसेंदिवस त्यात वाढ होताना दिसत आहे. यंदाच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या World Suicide Prevention Day निमित्ताने इंडियन मेडिकल असोसिएशन IMA , मानसोपचार तज्ञ संघटना, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम यांच्यातर्फे सायकल स्वारी cycle rally , एक दिवा लावू दारी उपक्रम राबविण्यात आले.

पूर्ण जगात दरवर्षी 8 लाख आत्महत्या होतात, म्हणजेच प्रत्येक 40 सेकंदाला जगात कोणीतरी आयुष्य संपावते आहे. या पेक्षा 20 पट जास्त लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. म्हणून आत्महत्या ही एक मोठी सामाजिक समस्या असून आत्महत्या प्रतिबंध ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे या विचारास धरून हे उपक्रम आयोजित केल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी सांगितले. डॉ जेजुरकर, डॉ चव्हाण, डॉ किरण राजोळे, डॉ राहुल सोनवणी, डॉ माधवी मुठाळ, डॉ पंकज भदाणे, डॉ स्मिता दहेकर आदींनी सर्व उपक्रम राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

एक दिवा लावू दारी

10 ते 17 सप्टेंबरच्या दरम्यान रात्री 8 वाजता जागतिक आत्महत्या प्रतिबंधन दिवसाच्या निमित्ताने आपल्या घराच्या खिडकीत प्रत्येकाने एक मेणबत्ती लावावी असे आवाहन नाशिक आयएमए आणि नाशिक मानसोपचार तज्ज्ञ संघटना यांच्यातर्फे करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील अनेक नागरिक, डॉक्टर यांनी आपापल्या घरात, ऑफिस मध्ये दिवा किंवा मेणबत्ती लावून या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक आणि आरोग्य विषयक चळवळी मध्ये सहभाग घेतला असे डॉ. सोननीस यांनी सांगितले.

सायकल स्वारीद्वारे प्रबोधन

आत्महत्या प्रतिबंधासाठी रविवार 12 सप्टेंबर रोजी सकाळी सायकल रॅलीद्वारे आत्महत्या प्रतिबंधाचा संदेश समाजास देण्यात आला. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर रॅलीचे आयोजन टाळण्यात आले. कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली. तसेच घोषणा दिल्या गेल्या नाहीत. सायकलला पत्रके लावून या विषयावर संदेश प्रदर्शित होईल अशा प्रकारे 4 जणांच्या चमूत सुरक्षित अंतर पाळत शहराच्या विविध भागात जनजागृती केली गेली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन तसेच आयर्न मॅनचा किताब पटकावणार्‍या आयएमएचे सदस्य डॉ. वैभव पाटील आणि डॉ अरुण गचाले यांनी देखील सहभागी घेत या अभियानास पाठिंबा दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com