मांजरपाडा पाण्यासाठी जलहक्काचा जागर

मांजरपाडा पाण्यासाठी जलहक्काचा जागर

नांदगाव। प्रतिनिधी Nandgaon

तालुक्याच्या विकासासाठी अत्यावश्यक ठरलेला मांंजरपाडा -1 च्या पाण्यासाठी ( Manjarpada Project Water ) जनजागराची पताका गावोगावी फडकविण्याचा निर्धार तालुका जलहक्क समितीतर्फे करण्यात आला आहे. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते निवृत्ती खालकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका जलहक्क समितीची बैठक झाली.

यावेळी मनमाड बचाव समितीचे पुंडलिक कचरे,आम आदमी पक्षाचे विशाल वडघुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय चव्हाण, भाजप शेतकरी आघाडीचे सुदाम काळे, युवा फाऊंडेशनचे सुमित सोनवणे, आरटीआय कार्यकर्ते अंबादास मोरे, कांदा उत्पादक संघटनेचे सोमनाथ मगर, शेतकरी दिलीप निकम, अरुण पवार, नानासाहेब आहेर, पंडित सूर्यवंशी, शिवाजी वडघुले, रा. काँ. चे शिवाजी जाधव, देविदास देवरे, वाल्मिक चव्हाण, जलहक्क समिती अध्यक्ष अशोक परदेशी आदी उपस्थित होते.

सांगोल्यात ज्या प्रमाणे कापूस उगवत नसताना तेथे आमदार गणपतराव देशमुख यांनी सूत गिरण्या उभारून आशिया खंडात नाव केले. त्याच प्रमाणे नांदगाव तालुक्यात विविध उत्पादक कंंपन्या उभारल्या तर ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील, असे प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यासाठी मांजरपाडा-1 ही जलयोजना विकासासाठी आवश्यक बाब आहे, असे जलहक्क समितीने लक्षात आणून दिली.

कार्यकर्त्यांनी दूरदृष्टी ठेवून लोकसहभागातून यासाठी जनजागृती कार्यात झोकून द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मांजरपाडा-1 जलप्रकल्पाची माहिती संकलित करून चित्रीकरण नांदगाव तालुक्याच्या गावागावातून चित्रफीत दाखवून जनजागृती करावी, असे सूचित करण्यात आले. त्यासाठी मांजरपाडा प्रकल्पाचा अभ्यास दौरा आयोजित करणे तसेच जलसंपदा मंत्री जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांचीही भेट जलहक्क समितीने घ्यावी,असे निर्णय घेण्यात आले. आभार विशाल वडघुले यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com