कृषि संजिवनी मोहिमेत तंत्रज्ञानाचा जागर

कृषि संजिवनी मोहिमेत तंत्रज्ञानाचा जागर

वावी । वार्ताहर | Vavi

तालुक्यात कृषी विभागाकडून (Department of Agriculture) आज (दि.25) कृषी संजीवनी मोहिमेतंर्गत (Krishi Sanjeevani Mohim) शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन कृषी तंत्रज्ञानाविषयी (Agricultural technology) शेतकर्‍यांना (farmers) मार्गदर्शन करण्यात आले.

कृषि विद्यापीठे, संशोधन केंद्र या ठिकाणी झालेले संशोधन, शोध, प्रायोगिक तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतकर्‍यांनी शोधलेले तंत्रज्ञान सर्व सांमान्य शेतकर्‍यांना माहिती व्हावे यासाठी कृषी विभागाकडून तालुक्यातील विविध गावांत आजपासून (दि.25) कृषी संजीवनी मोहिमेची सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी ‘कृषि क्षेत्रातील तंत्रज्ञान दिवस’ (Technology Day in Agriculture) कसा साजरा करावा याविषयी नियोजन करण्यात आले.

या अनुषंगाने तालुक्यातील पास्ते, श्रीरामपूर, वडांगळी, धुळवड, जयप्रकाशनगर, सोनांबे, निमगाव-सिन्नर येथे कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत मका (Maize) व सोयाबीन पिकावरील (Soybean Crop) बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक, सोयाबीन उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांना सोयाबीन व मका आंतरपीक तंत्रज्ञान, बी. बी. एफ पध्दतीने सोयाबीन लागवड तंत्रज्ञान (Soybean cultivation technology), एकात्मिक किड रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर मार्गदर्शन व कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. पास्ते येथे मका पिक प्रात्यक्षिक अंतर्गत निविष्टा वाटप करण्यात आल्या.

तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, सिजेंटाचे तुषार डावरे, श्रीरामपूर येथे कृषी पर्यवेक्षक राजेंद्र दोडके, वडांगळी येथे मंडळ कृषि अधिकारी अशोक बागुल, धुळवड येथे मंडळ कृषि अधिकारी अशोक अल्हाट, कृषि पर्यवेक्षक दत्तात्रय साळुंखे, जयप्रकाशनगर येथे कृषि पर्यवेक्षक धनेश कोते, सोनांबे येथे मंडळ कृषी अधिकारी महेश वेठेकर, निमगाव सिन्नर येथे मेघा पेढेकर यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात या गावातील शेकडो शेतकर्‍यानीं सहभाग घेत कृषी तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी श्रीरामपूरच्या सरपंच सुनीता कनकुसे, उपसरपंच संदीप हांडोरे, प्रगतीशील शेतकरी रमेश खाडे, सचिन हांडोरे, जयश्री हांडोरे, अलका हांडोरे, वडांगळीचे सरपंच राहुल खुळे, उपसरपंच रविंद्र माळी, माजी सरपंच योगेश घोटेकर, विलास खुळे,

धुळवडचे प्रगतशील शेतकरी निवृत्ती आव्हाड, मधुकर आव्हाड, अर्जुन आव्हाड, दौलत रोकडे, सुभाष आव्हाड, पंढरीनाथ आव्हाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कृषि सहाय्यक श्रीहरी केदार, सुरेश शेळके, चेतन नागरे, महेशकुमार गरुड, प्रदीप मोरे, शाम गडाख, मेघा पेढेकर, प्रदीप भोर, बाळासाहेब देठे यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com