‘दामिनी’ अ‍ॅपद्वारे विजेच्या घटनांची जनजागृती
नाशिक

‘दामिनी’ अ‍ॅपद्वारे विजेच्या घटनांची जनजागृती

वीज पडून होणारी हानी टाळण्यासाठी अ‍ॅप

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पावसाळयात दरवर्षी वीज पडून जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनावरे दगावतात. अनेकदा वीज कोसळून जीवित हानी देखील होती. मात्र यापुढे वीज पडून होणारी हानी टाळण्यासाठी आयआयटीएम व आयएमडी यांनी दामिनी हे अ‍ॅप तयार केले आहे. या माध्यमातून वीज पडल्यावर काय करावे व कोणत्या उपाययोजना कराव्यात याची जनजागृती केली जात आहे. विशेषत: ज्या भागात वीज पडून वित्त व जिवित हानी होते तेथील लोकांसाठी हे अ‍ॅप महत्वपूर्ण ठरणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून वीज पडुन होणार्‍या दुर्घटना टाळण्यासाठी राज्य शासनाने परीपत्रक काढून सुचना जारी केल्या आहेत. त्यात वीज कोसळून घडणार्‍या आपत्तीबाबत लघु कृती आराखडा तयार करावा. वीज पडणार्‍या घटनांबाबत आयएमडी व आयआयटिएम या संकेतस्थळावर दिल्या जाणार्‍या सुचनांची नोंद घेऊन कार्यवाही करावी.

राष्ट्रिय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून वीज कोसळणे आणी काय करावे व काय करु नये याबाबतची ध्वनिफित व लघुचित्रपट लोकांना दाखवावा. वीज कोसळून होणार्‍या घटना रोखण्यासाठी वीज प्रवण क्षेत्रात वीज रोधक यंत्रणा बसवणे. वीज प्रवण क्षेत्रात आगाऊ सूचना निर्गमित करणे. वीज प्रवण क्षेत्रात वीज पडल्यावर काय करावे व काय करु नये याची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन जनजागृती करावी.

वीज पडून जखमी झाल्यास काय प्राथमिक उपचार करावे याची माहिती द्यावी. ज्या ठिकाणी वीज पडण्याच्या घटनांची माहिती गोळा करुन त्याचे दस्तऐवजीकरण करुन हा अहवाल शासनाला पाठवावा व केस स्टडीम्हणून त्याचा अभ्यास कराव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com