सायकल रॅलीद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जनजागृती

सायकल रॅलीद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जनजागृती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील नागरिकांनी पर्यावरणाची (Environment) हानी टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करावा, यासाठी नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनच्या वतीने (Nashik Cyclists Foundation) आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते...

जसपाल सिंग बिर्दी सायकल ट्रॅक, साईनाथनगर (Jaspal Singh Birdi Cycle Track, Sainathnagar) येथून सुरुवात झाली. सिटी गार्डन, इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांना पर्यावरण पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा हा संदेश देण्यात येऊन नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.

यावेळी सायकलींना जनजागृतीचे फलक लावलेले होते. गणेश पूजेचे एकच नियोजन-घरी स्थापना घरीच विसर्जन, निर्माल्य कलशात टाका-गोदामाईचे पावित्र्य राखा, करू या स्थापना छोट्या गणेशाची-भावभक्ती ठेवून मोठ्या मनाची, शाडू मातीचे बाप्पा घरी आणा, पर्यावरणपूरक सजावट करा असे संदेश देणारे फलक सायकलींना लावण्यात आले

त्यानंतर सायकल रॅलीचे प्रस्थान इंदिरानगर येथून मुंबई नाका (Mumbai Naka), त्र्यंबक नाका (Trambak Naka), गोल्फ क्लब मैदान (Golf Club Ground) येथे झाले. गोल्फ क्लब मैदानावर नागरिकांना इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.

शिक्षक दिनानिमित्त एस. टी. आहेर, गणेश लोहार, डॉ. योगिता घुमरे, मंगला सुरसे, रायभान दवंगे, माधवराव पवार या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या वतीने गणेश लोहार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे (Rajendra Wankhede) यांनी आभार मानले.

उपक्रमाच्या उशास्वीतेसाठी नाशिक सायकलिस्टसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, सचिव डॉ. मनीषा रौंदळ, खजिनदार रवींद्र दुसाने, अविनाश लोखंडे, प्रवीण कोकाटे, राजेश्वर सूर्यवंशी, जाकीर पठाण, दविंदर भेला व मोहन देसाई यांनी पुढाकार घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com