रस्ता सुरक्षा अभियानातून वाहन चालकांचे प्रबोधन

रस्ता सुरक्षा अभियानातून वाहन चालकांचे प्रबोधन

सिन्नर । वार्ताहर Sinnar

येथील कडवा गेस्ट हाउसवर आयोजित रस्ता सुरक्षा अभियानातून वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात आले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ता सुरक्षा अभियानाचा कार्यक्रम पार पडला. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, मोटार वाहन निरीक्षक सुनील म्हेत्रे, योगेश मोरे, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक तडवी उपस्थित होते. रस्त्यावरील सांकेतिक चिन्हांचा व दुचाकीवरील हेल्मेटचा वापर कसा करावा याचे महत्त्व भगत यांनी पटवून दिले.

रस्त्यावरील खुणांचा, मार्गदर्शक सूचना प्रत्येकाने समजून घ्यायला हव्यात असे कोकाटे म्हणाल्या. मोटर सायकल चालवताना मोबाइलचा वाढता वापर यामुळे होणारे अपघात यांची उदाहरणे गोविंद लोखंडे यांनी पटवून फिली. सतीश भोर, अण्णासाहेब वाजे, सुनील गवळी, संपत फड, अशोक बरके, संतोष वराडे, प्रशांत शिंदे, योगेश शिंदे, राजू गवळी, सोमनाथ चांडोले यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com