PhotoGallery : काका पेपर बॅग वापरा! चिमुकल्यांची चित्रांद्वारे जनजागृती

राष्ट्रीय पेपर बॅग दिवस : देशदूतचा उपक्रम
PhotoGallery : काका पेपर बॅग वापरा! चिमुकल्यांची चित्रांद्वारे जनजागृती

नाशिक । Nashik

काका पेपर बॅग वापरा ना! अशी आर्त साद चिमुकल्यांनी चित्रांद्वारे केली आहे. निमित्त होते १२ जुलै राष्ट्रीय पेपर बॅग दिवसाचे (National Pepar Bag Day) .

पर्यावरणाला हानीकारक (Harmful to the environment) असलेल्या प्लास्टिकचा वापर (Use of plastic) कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. त्यातच प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कागदी पिशव्या (Pepar Bag) वापरण्यात येत आहे. कागदी पिशव्यांचा वापर वाढावा यासाठी जागतिक कागदी पिशवी दिवस १२ जुलै रोजी साजरा केला जातो. यावर्षी प्लास्टिकचे निर्मूलन (Elimination of plastics) आणि पृथ्वीचे रक्षण हे घोषवाक्य या दिवसाच्या निमित्ताने निश्चित करण्यात आले आहे.

दरम्यान देशदूतच्या (Deshdoot) माध्यमातून नाशिक शहरातील काही चिमुकल्यांचे पेपर बॅगचे काढावयास सांगितले. यांनतर अनेक मुलांनी युवा उपक्रमात सहभाग घेतला. अनेकांनी चित्रासोबत सुरकेच संदेशही दिला होता. या माध्यमातून लहान मुलांनी एकप्रकारे मोठ्यांना प्लास्टिक बॅग न वापरण्याचा सल्लाच दिल्याचे लक्षात येते.

निसर्गात वावरत असताना पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देण्याची जबाबदारी मानवाची आहे. प्लास्टिक वापरला पर्याय म्हणून सर्वतोपरी प्रयत्न होत असतानाच कागदी पिशव्या वापरण्याचा विचार पुढे आला आणि कागदी पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरु झाला. कागदाच्या पिशव्या या विघटनशील पदार्थांमध्ये येत असल्याने भविष्यातील पिढ्यांसाठी कागदाची पिशवी वापरणे महत्त्वाचे ठरणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com