महात्मा फुलेंंमुळे बहुजन समाजात जागृती- पालकमंत्री भुजबळ

महात्मा फुलेंंमुळे बहुजन समाजात जागृती- पालकमंत्री भुजबळ

येवला | प्रतिनिधी Yeola

आद्यसमाज सुधारक, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले (Mahatma Jotirao Phule )यांनी बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त केलं. स्वातंत्र्य, समता व बंधुतेची बीजे रोवत देशात सामाजिक क्रांती घडवून आणली असे सांगत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ ( Guardian Minister Bhujbal ) यांनी प्रतिमापूजन केले.

येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री भुजबळ यांनी महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, ज्येष्ठ नेते आंबदास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, येवला बाजार समिती प्रशासक सभापती वसंत पवार, नगरसेवक दिपक लोणारी, अडतीसगाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर, संतोष खैरनार, सुभाष गांगुर्डे, भाऊसाहेब धनवटे, गोटू मांजरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.