येस टू व्हॅक्सिन, नो टू व्हेंटिलेटर उपक्रमातून प्रबोधन

येस टू व्हॅक्सिन, नो टू व्हेंटिलेटर उपक्रमातून प्रबोधन
करोना

सिन्नर । Sinnar

सध्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक संस्था पुढे येऊ लागल्या आहे. सिन्नर तालुक्यात सेव्ह द चिल्ड्रन, सी.वाय.डी. ए. संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबविले जात असून येस टू व्हॅक्सिन, नो टू व्हेंटिलेटर या उपक्रमातून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रबोधन करण्यात येत आहे.

दोन्ही संस्थांच्या माध्यमातून तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येस टू व्हॅक्सिन, नो टू व्हेंटिलेटर हे अभियान हाती घेतले आहे. या संस्थांनी स्वयंसेवकांचे गटा-गटात विभाजन केले असून प्रत्येकाला जबाबदारी ठरवून दिली. आहे.

यामध्ये तालुक्यात ज्या ज्या केंद्रांवर आणि तालुक्याच्या ठिकाणी लसीकरण आहे, त्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांना लसीची माहिती देणे, त्यांची नोंदणी करणे तसेच गर्दीचे योग्य नियोजन करणे आदी कामे केली जात आहे. सी. वाय. डी. ए. संस्थेचे संचालक प्रवीण जाधव, सिन्नर विभागाचे प्रकल्प समन्वयक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था विनामूल्य सेवा देत आहे.

संस्थेचे कर्मचारी भाऊसाहेब शेळके, विकास म्हस्के, मिताली सुगंधी, अक्षय चिने, विशाल बोंबटकर, ऋतुजा काळे, सूरज वाघ,अविनाश सोनवणे आदी स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

दरम्यान, येस टू व्हॅक्सिन, नो टू व्हेंटिलेटर उपक्रम सिन्नर तालुक्यातील 30 हून अधिक गावात तसेच शहरात राबवविण्यात आला आहे. त्याचा जवळपास 7 हजारांहून अधिक नागरिकांना फायदा झाला आहे.

अनेक भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याने संस्थेतील स्वयंसेवक लसीबाबत जनजागृती करणे आदी कामे विनामूल्य पार पाडत आहे.

या उपक्रमाचे तहसीलदार राहुल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, डॉ. वैभव गरुड यांनी कौतुक केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com