विद्यार्थी व शिक्षकांकडून जनजागृती

विद्यार्थी व शिक्षकांकडून जनजागृती

ठाणगाव । वार्ताहर

तालुक्यातील पाडळी Padali येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात Pataleshwar Secondary School विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येत नववर्षात कोरोना मुक्तीचा संकल्प केला.

तोंडाला सतत मास्क, सॅनिटायजरचा वापर, सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर करू व त्याचे दुष्परिणाम समाजास सांगू, आपण आरोग्यदायी चांगल्या सवयी अंगीकारू अशी शपथ घेतली. समाज जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी स्वकृतीतून ‘यूज मास्क’ Use Mask या प्रतिकात्मक बोध चिन्हातून कोरोनाचे नियम पाळा व कोरोना भयमुक्त व्हा हा संदेश दिला.

विद्यालयात गत वर्ष 2021 ला निरोप देत नववर्ष च्या उगवत्या सूर्य किरणाच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी कोरोनामुक्ती या संकल्पाने स्वागत केले. नववर्षाच्या सुरुवातीला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोरोना मुक्त शाळा, समाजातील घटकांना कोरोना या रोगाची लक्षणे व त्यावरील उपाय योजना आपण कटाक्षाने पाळू शाळा व परिसर कोरोना मुक्त ठेवण्याची शपथ घेऊन मानवी साखळी बोध चिन्ह विद्यार्थ्यांनी तयार केले.

विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षापासून आपण सर्वजण कोविडच्या विषाणुजन्य रोगाशी झुंज देत आहोत. सर्व नियमांचे पालन करत आपण या संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करू असे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी सांगितले. आपले शैक्षणिक जीवन हळूहळू सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असतांना कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरींएटची लक्षणे व त्यापासून स्व-संरक्षणासाठी आपण करावयाच्या उपाययोजना व नियमाचे पालन करण्याबद्दल देशमुख यांनी माहिती दिली.

या रोगाचे घातक परिणाम व त्यापासून दूर राहण्यासाठी आपण आपल्या आरोग्याची घ्यावयाची काळजी व गावातील, परिसरातील एकही व्यक्ती कोरोनाबाधित होणार नाही याची अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सचिव प्रा. टी. एस. ढोली, विश्वस्त अरुण गरगटे, सुरेखा रेवगडे, सुरेखा बोगीर, आशापुरचे सरपंच विष्णूपंत पाटोळे, अशोक रेवगडे, चंद्रभान रेवगडे, धनजंय रेवगडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com